नाशिक

रोटरी क्लब जळगाव नॉर्थतर्फे पाच डायलिसिस मशीनची सुविधा

CD
‘रोटरी’तर्फे पाच डायलिसिस मशिनची सुविधा महादेव हॉस्पिटलमध्ये आज उद्घाटन; नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे सामाजिक बांधिलकी जपत महादेव हॉस्पिटलमध्ये पाच हेमोडायलिसिस मशीन बसविण्यात आली आहेत. ‘जळगाव नॉर्थ रोटरी हेमोडायलिसिस सेंटर’ या ग्लोबल ग्रँड प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी (ता. ६) सकाळी साडेअकराला महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक येथे होणार आहे. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ हा होस्ट स्पॉन्सर, रोटरी क्लब ऑफ सिंगापूर हा आंतरराष्ट्रीय स्पॉन्सर असून रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होईल. यावेळी रोटरीचे माजी जिल्हा प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, जिल्हा प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्यासह माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पीडीजी राजेंद्र भामरे आणि डॉ. वैभव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पाचे समन्वयक चंदन कोळे व मेडिकल कमिटीचे चेअरमन डॉ. शौनक पाटील असून, मावळते अध्यक्ष बिपिन पाटील, सचिव हितेंद्र धांडे व प्रोजेक्ट्स सचिव भरत करडिले यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रोटरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष ओलायिंका बाबालोला व २०२५-२६ चे अध्यक्ष फ्रान्सेस्को अरेझो यांचे नेतृत्व लाभले आहे. चौकट नवीन कार्यकारिणीचे आज पदग्रहण दरम्यान, याच दिवशी सकाळी दहाला रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थच्या २०२६-२७ वर्षातील नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा होणार आहे. उमेश पाटील अध्यक्ष, रुपेश सरोदे मानद सचिव (प्रशासन) आणि प्रशांत अग्रवाल सचिव (प्रकल्प) म्हणून पदभार स्वीकारतील. सोहळ्यानंतर रोटेरियन, मित्र व कुटुंबीयांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT