नाशिक

रामदास कॉलनीतील उद्यान तीन महिन्यांत खुले होणार

CD
NSK26H28855 जळगाव : रामदास कॉलनी येथील उद्यान विकासकामांची पाहणी करताना आयुक्त आदित्य जिवने, महापौर दीपमाला काळे आदी नगररसेवक व अधिकारी वर्ग. --- रामदास कॉलनीतील उद्यान तीन महिन्यांत होणार खुले साठ टक्के काम पूर्ण; वृक्षारोपण, ज्येष्ठांसाठी सुविधा अन् सौरदिव्यांवर भर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : रामदास कॉलनीतील निर्माणाधिन उद्यानाचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश महापौर दीपमाला काळे आणि महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी शनिवारी दिले. उद्यानाच्या कामाची त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला. सध्या उद्यानाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून परिसर अधिक हिरवागार करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशस्त व आरामदायी बैठक व्यवस्था उभारण्यात येणार आहे. कामाची गती वाढवून उर्वरित कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना महापौर व आयुक्तांनी दिल्या. पाहणीवेळी नगरसेवक नितीन बरडे, गायत्री राणे, ॲड. शुचिता हाडा, अनिल अडकमोल यांच्यासह शहर अभियंता योगेश बोरोले आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चौकट सौरदिव्यांमुळे होणार वीजबचत उद्यानातील विद्युत व्यवस्थेचा आढावा घेताना आयुक्त जिवने यांनी पारंपरिक पथदिव्यांऐवजी सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उद्यानातील वीजखर्च कमी होण्यासोबतच पर्यावरणपूरक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच उपस्थित नगरसेवकांनी उद्यान परिसरात विहीर खोदण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

SCROLL FOR NEXT