NSK26H28862
जळगाव : जखमी माकडाला पकडताना वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य.
.......
घरात शिरलेल्या जखमी
माकडाची सुखरूप सुटका
वनविभाग, अग्निशमन दल, वन्यजीव संस्थेची संयुक्त कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ५ : कासमवाडी परिसरातील एका घरात तीन दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत एक माकड शिरल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वनविभाग, अग्निशमन दल आणि वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकाने तातडीने धाव घेत सुरक्षित रेस्क्यू करून माकडाचे प्राण वाचविले.
घरात माकड शिरल्याची माहिती मिळताच नागरिकांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे तसेच अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गालफाडे व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जळगाव वन विभागाचे आरएफओ लांमगे यांच्याशी संपर्क साधून वन विभागाला पाचारण केले. वन विभागाचे कर्मचारी आवश्यक साहित्य घेऊन दाखल झाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाळीच्या सहाय्याने माकडाला सुरक्षितपणे पकडण्यात आले. यावेळी योगेश गालफाडे, अश्वजीत घरडे व स्वप्नील गोसावी यांनी रेस्क्यूमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर माकडाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. वन विभागाने जखमी माकडाला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. डॉ. चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्यानंतर प्रकृती स्थिर झाल्याची खात्री करून त्याला सुरक्षित जंगल परिसरात मुक्त करण्यात आले. या कारवाईत वन विभागाचे स्वप्निल गोसावी, विकास पाटील, गोकुळ सपकाळे, युवराज वैराळे, अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे तसेच वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेश गालफाडे व सदस्य अर्जुन भालेराव सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.