नाशिक

शिक्षक दिनी उपक्रम

CD
धुळे : टुडे पान २ साठी... -- फोटो क्रमांक : 28867 धुळे : विकास विद्यालयात शिक्षकदिनी झालेल्या कार्यक्रमात शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांसह सत्यजित सिसोदे. -- विकास विद्यालयात शिक्षक दिनी उपक्रम -- विद्यार्थी बनले शिक्षक; गुरुजनांप्रती आदर व्यक्त सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील नरडाणा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विकास विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते सत्यजित सिसोदे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन, दीपप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून भूमिका पार पाडत कार्यक्रमाचे नियोजन केले. विकास विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, उर्दू माध्यमिक विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गीत व नृत्य सादर करून गुरुजनांप्रति आदर व्यक्त केला. प्राचार्य ए. बी. कोतकर यांनी श्री. सिसोदे यांचे स्वागत केले. विद्यार्थी शिक्षकांनी प्राचार्य कोतकर, पर्यवेक्षक एस. बी. जगताप, मुख्याध्यापक पी. जे. वाघ, प्राचार्या जयश्री पवार, सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा पत्र देत सन्मानित केले. आमदार किशोर दराडे यांचे प्रतिनिधी देवरे व श्री. आव्हाड यांनी श्री. सिसोदे यांचा सत्कार केला. श्री. देवरे यांनी शिक्षकांच्या अडचणी व विद्यालयाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थी शिक्षिका तनिष्का बोरसे, आराध्या पाटील, संजिवनी पाटील, स्वामिनी सिसोदे यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. काळे, आर. एस. सिसोदे, एस. आर. पाटील, धवल पाटील, व्ही. आर. पाटील, जी. वाय. सोनवणे, जे. ए. सिसोदे, कविता पाटील, तेजस सिसोदे यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

Talegaon Dhamdhere Leopard Attack: तळेगाव ढमढेरेत दोन बिबट्यांचा गोठ्यात धुमाकूळ; ४ मेंढ्या ठार, २३ जखमी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT