नाशिक

श्री भवानी मंदिरात केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

CD
संक्षिप्त संत सेना महाराजांची मंगळवारी पुण्यतिथी जळगाव : संत सेना नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर संघटनेतर्फे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता.८) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहाला सरदार वल्लभभाई पटेल हॉल येथे कार्यक्रम होणार आहे. संत सेना महाराज यांची प्रतिमा पूजन तसेच महाआरती होईल. तसेच समाजासाठी तसेच संघटनेसाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम होणार आहे. सर्व नाभिक समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. --- केदारनाथ मंदिराची साकारतेय प्रतिकृती जळगाव : सुभाष चौक, सराफ बाजार परिसरातील श्री भवानी तथा महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या श्रावण सोमवार महोत्सवाचा (ता.७) समारोप होणार आहे. यानिमित्त मंदिराच्या सभागृहात केदारनाथ मंदिराची ८ बाय ८ फूट आणि १० फूट उंचीची भव्य प्रतिकृती सचिन राणा व बंटी पुरोहित साकारणार आहे. सायंकाळी पाचपासून हा देखावा भाविकांसाठी खुला राहणार आहे. सकाळी अकराला ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत लघुरुद्र अभिषेक होईल. महाआरतीनंतर ‘हर घर सुंदरकांड’ भजन मंडळाची भजनसंध्या होईल. दीपा तापडिया, किरण शर्मा, मेघराज सोनी व प्रदीप जोशी शिवभजने सादर करतील. रात्री नऊला शयन आरतीनंतर होणार असून, भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विनोद त्रिपाठी व किसनलाल पुरोहित यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

Talegaon Dhamdhere Leopard Attack: तळेगाव ढमढेरेत दोन बिबट्यांचा गोठ्यात धुमाकूळ; ४ मेंढ्या ठार, २३ जखमी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT