नाशिक

सेनेचे उपोषण स्थगित

CD
धुळे ः टुडे २ साठी -- फोटो क्रमांक ः 28903 धुळे : अवैध व्यवसायांप्रश्‍नी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून लेखी आश्वासन स्वीकारताना ॲड. पंकज गोरे व शिष्टमंडळ. -- युवा सेनेचे उपोषण स्थगित -- अवैध व्यवसायांचा प्रश्‍न; पोलिसांकडून आश्वासन -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : शहरातील वाढते अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲड.. पंकज गोरे यांनी सुरू केलेले साखळी उपोषण अखेर नवव्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने सर्व अवैध व्यवसायांवर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे ॲड. गोरे यांनी सांगितले. गेल्या २७ ऑगस्टपासून हे आंदोलन सुरू होते. या काळात ॲड. गोरे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रतीकात्मक आंदोलने केली. यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली, ज्यामध्ये त्यांनी अवैध व्यवसायांसह ड्रग्ससारख्या अमली पदार्थांबाबत कडक कारवाई सुरू केल्याचे सांगितले. आंदोलकांनी जमा केलेल्या अवैध व्यवसायांविषयी यादीही पोलिस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याचे ॲड. गोरे यांनी स्पष्ट केले. पंकज भारस्कर, संदीप चौधरी, संजय पाटील, सागर निकम, सागर साळवे, डॉ. सुनील पाटील, बंटो गोरे, स्वप्नील सोनवणे, निलेश चौधरी, सौरभ जवराळ, गोकुळ येलमामे, दर्शन खंबायत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT