धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 28905
धुळे : रेल्वे स्टेशन रोडलगत कान्हादेश स्मारकाच्या अनावरणावेळी उपस्थित अनुप अग्रवाल, मायादेवी परदेशी, डॉ. सुभाष भामरे, नितीन कापडणीस, ज्योत्स्ना पाटील, लताताई सोनार, गजेंद्र अंपळकर व भाजपचे पदाधिकारी.
-
कान्हादेश स्मारकामुळे वैभवात भर
-
आमदार अग्रवाल : रावेर एमआयडीसीचा मार्गही मोकळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : येथील रेल्वे स्टेशन रोडलगत नवनिर्मित कान्हादेश स्मारकामुळे धुळे शहराच्या वैभवात अभूतपूर्व भर पडली आहे. या स्मारकासोबतच शहरातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांना गती मिळाली आहे, असे प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केले. जनता विकासाच्या बाजूने असल्यानेच हे शक्य झाले आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कान्हादेश स्मारकाचे लोकार्पण आमदार अग्रवाल यांच्या हस्ते झाले. महापौर मायादेवी परदेशी, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर ज्योत्ना पाटील, स्थायी सभापती लताताई पोतदार, महिला- बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, माजी महापौर मोहन नवले, चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, कल्याणी अंपळकर, डॉ. सुशिल महाजन, जगदीश देवपूरकर, हिरामण गवळी, मनपा शहर अभियंता चंद्रकांत उगले व भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.
-
विरोधकांचा समाचार
आमदार अग्रवाल यांनी अवैध व्यवसायांविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की धुळ्यात सट्टा माझ्या जन्माआधीपासून सुरू आहे, मात्र अवैध व्यवसायांवर सर्वाधिक कारवाया माझ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात झाल्या आहेत. शहराची तरक्की काही लोकांना रुचत नाही, म्हणून ते सोशल मीडियावर नाहक टीका करत आहेत. त्यांनी रिल्स काढण्यापेक्षा स्वतःच्या चेहऱ्यावरचे खड्डे पाहावेत.
-
रावेर एमआयडीसी
शहरातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत आमदार अग्रवाल म्हणाले, की गेल्या ५० वर्षांत जे कुणी करू शकले नाही, ते मी करून दाखविले आहे. प्रस्तावित रावेर एमआयडीसीला ग्रीन सिग्नल मिळाला असून, वन विभागाची जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित झाली आहे आणि त्याचे अधिकृत नोटिफिकेशनही निघाले आहे.
-
विकासाचा आढावा
आमदारांनी शहरातील अनेक विकासकामांची माहिती दिली. यात पारोळा चौफुली ते साक्री रोडवरील हनुमान टेकडीजवळील कृष्णाई हॉटेलपर्यंतच्या रस्त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे टेंडरही प्रसिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे फागणे ते पारोळा चौफुलीपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचे काम ६८ कोटी रुपयांतून पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक बंटी मासुळे, नगरसेविका सुरेखा उगले यांनी संयोजन केले. श्यामसुंदर पाटील यांनी सूत्रसंचलन केले.
-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.