नाशिक

१० लाखांची चोरी

CD
धुळे ः टुडे १ साठी -- ग्राम महसूल अधिकाऱ्यासह व्यापाराकडे धाडसी घरफोडी - दहा लाखांचा ऐवज लंपास सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ५ : शहर व परिसरात बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे सत्र सुरूच असून, विंचूर (ता. धुळे) येथे ग्राम महसूल अधिकारी आणि शहरातील पारोळा रोडवरील सिद्धेश्वर हायट्स येथे एका व्यापाऱ्याकडे झालेल्या दोन स्वतंत्र घरफोड्यांत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ९ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याप्रकरणी धुळे तालुका व आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. - विंचूर येथील ग्राम महसूल अधिकारी जिजाबराव संजय बोरसे यांचे घर दोन सप्टेंबरला सायंकाळी सहा ते तीन सप्टेंबरला सकाळी सहादरम्यान बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ४ लाख ८३ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - पाच लाखांची चोरी दुसऱ्या घटनेत धुळे शहरातील पारोळा रोडवरील सिद्धेश्वर हायट्समधील कापड व्यावसायिक निलेश किसनलाल खंडेलवाल हे दोन सप्टेंबरला दुपारी घराबाहेर कामानिमित्त गेले होते. त्या दरम्यान चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तसेच बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडले. घरातून ३ लाख ८४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, ८० हजार रुपयांचे चांदीचे दागिने, ५५ हजार रुपये रोख आणि १ हजार २०० रुपयांची एअर बॅग, असा एकूण ५ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे तपास करीत आहेत.

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

SCROLL FOR NEXT