धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 28908
धुळे : भगवा चौकात दहीहंडी फोडताना बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनी.
--
बर्वे कन्या छात्रालयाच्या मुलींनी फोडली दहिहंडी
-
युवा सेनेतर्फे नशामुक्तीवर जनजागृती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : शहरात महिला दहीहंडी उत्सवाला यंदा सामाजिक जाणिवांची अनोखी किनार लाभली. भगवा चौकात युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांच्यातर्फे शनिवारी (ता. ५) या उत्सवात अवैध व्यवसायांची दहीहंडी हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी ही दहीहंडी फोडत शहरातील अवैध व्यवसाय, वाढत्या गुन्हेगारीविरोधात, तसेच नशामुक्तीबाबत सामाजिक संदेश दिला.
अवैध व्यवसाय आणि त्याचा थेट परिणाम तरुणाईवर होत असल्याची बाब अधोरेखित करण्यासाठी यंदाच्या उत्सवाचे स्वरूप वेगळे ठेवण्यात आले. पारंपरिक उल्हासाला प्रबोधनाची जोड देत विद्यार्थिनींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दहीहंडीच्या पारंपरिक गाण्यांसोबतच आदिवासी गीतांच्या तालावर विद्यार्थिनींनी धरलेला ठेका आणि सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींना प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रद्धा पगार, मनीषा साळवे, अर्चना गोरे आणि सोनल गोरे यांच्या उपस्थितीत पारितोषिकाने गौरविण्यात आले. ॲड. गोरे, भगवा चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष पंकज भारस्कर, प्रवीण मुर्तडक, विनोद रनमळे, आप्पा लहामगे, योगेश गोरे, सागर निकम, सागर साळवे, मयूर कुळकर्णी, निलेश चौधरी आदी उपस्थित होते. कवी जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय दीक्षित यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.