नाशिक

गणेशोत्सवापूर्वी मोहाडी-शिरसोली रस्त्याचे खडीकरण

CD
(ही बातमी गरजेनुसार विना फोटो घेऊ शकता) -- NSK26H28851 जळगाव : मोहाडी-शिरसोली रस्त्याची पाहणी करताना आयुक्त आदित्य जिवने. सोबत नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेवक नितीन सपके व आदी अधिकारी. ..... गणेशोत्सवापूर्वी मोहाडी-शिरसोली रस्त्याचे खडीकरण बॅरिकेडिंगचेही निर्देश; ३५ लाखांचा प्रस्ताव महासभेत ठेवण्याची आयुक्तांची सूचना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहाडी रोडवरील गुरु पेट्रोल पंप ते शिरसोली मार्गाची दुरवस्था लक्षात घेता महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खडीकरण करण्यासह गटारीलगत सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग उभारण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. गणेशोत्सवात या मार्गावरून मिरवणुका जातात. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पाचोरा मार्गावरील वाहतूकही याच रस्त्यावरून वळविली जाते. मात्र, अरुंद आणि खराब झालेल्या रस्त्यालगतची गटार सध्या नाल्यासारखी झाली असून, वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी घडलेल्या अपघातांची माहिती नगरसेविका वैशाली पाटील यांनी आयुक्तांना दिली. तसेच रस्ता विकसित झाल्यास परिसरातील सुमारे एक लाख नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पाहणीवेळी नगरसेवक नितीन सपके, शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचनाकार अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Without Fear or Favour Book Controversy : "विदाउट फ़ियर ऑर फ़ेवर" पुस्तकातील दाव्यांची जोरदार चर्चा; न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावरून नवा वाद!

सूर्याचा राहूच्या नक्षत्रात प्रवेश; वृषभसह ५ राशींना नोकरी अन व्यवसायात आर्थिक लाभ

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

SCROLL FOR NEXT