नाशिक

शेतमजूर बेपत्ता; अपहरणाचा संशय

CD
मुख्यअंकासाठी ----- DIH26A01788 ------------ मोहराळा येथील शेतमजूर बेपत्ता; अपहरणाचा संशय -------- यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा दहिगाव (ता.यावल), ता. ५ : यावल तालुक्यातील मोहराळा येथील तरुण शेतमजूर बेपत्ता झाला आहे. दरम्यान, त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यावरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहराळा येथील शेतमजूर नानसिंग बारेला (वय २६) हा गेल्या दोन-अडीच वर्षांपासून गावात पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यात असून, मोलमजुरी करून आपला चरितार्थ भागविताे. मात्र, गुरुवारी (ता.३) रात्री त्याने आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण करून झोपला. परंतु, सकाळी तो बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध पत्नी सुनीता मानसिंग बारेला हिने शेजारी असलेल्या सुनील बारेला व सहकाऱ्यांसोबत परिसरात घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. त्याचे काही कारणासाठी अपहरण केले असल्याचा संशय असून, त्याला दाबून ठेवले असल्याचे त्याच्या पत्नीने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहितद्दीन सय्यद व सहकारी राजेंद्र पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs PAK Asia Cup: पाकिस्तानच्या २८ धावांत १० विकेट्स! भारतासमोर शेजाऱ्यांनी गुडघे टेकले, T20 तील लाजीरवाणी कामगिरी

पाकिस्ताननं आता 'नापाक कृत्य' करण्याचा प्रयत्न केल्यास...; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट इशारा, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT