नाशिक

रस्ते हॉकर्सच्या विळख्यात; वाहतुकीचा श्वास कोंडला!

CD
अतिक्रमण विशेष पान टुडे चारसाठी मुख्य बातमी ---- प्रमुख रस्ते हॉकर्सच्या विळख्यात ---- चौकाचौकांत अन् रस्त्यावरच ठेले; प्रत्येक रस्त्यावर दररोज एक-दोन हातगाडीची भर -हातगाड्यांत नगरसेवकांची ‘भागिदारी’ -मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद -मनपाच्या टास्क फोर्ससमोर आव्हान भूषण श्रीखंडे : सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : शहरातील प्रमुख रस्ते व चौकांवर दिवसेंदिवस हॉकर्सची संख्या वाढत असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. बाजारपेठेपासून मुख्य रस्त्यांपर्यंत दोन्ही बाजूंनी खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते तसेच अन्य हॉकर्सनी जागा व्यापल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून थेट रस्त्यावर टेबल-खुर्च्या मांडल्या जात असल्याने वाहनचालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. प्राप्त माहिती व ‘सकाळ’च्या पाहणीत शहरात गेल्या १०-१२ वर्षांत सुमारे पाच हजारांहून अधिक हॉकर्स वाढलेत. रस्ते रुंद होत असताना त्या तुलनेत कितीतरी पटीने रस्त्यांवर हॉकर्सचा ठिय्या मांडला जात असल्याने रस्ते अक्षरक्ष: बोळी बनलेत.. भाजी व फळविक्रेत्यांच्या हातगाड्या आणि दुकानांसमोर ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदी करीत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडते. अरुंद झालेल्या रस्त्यांवरून वाहने काढताना अनेकदा किरकोळ अपघातही होत आहेत. त्यामुळे हॉकर्सचा प्रश्न आता केवळ अतिक्रमणापुरता मर्यादित न राहता वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनला आहे. १४-१ प्रमुख रस्ते अन्‌ स्थिती शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान परिसर, महामार्गालगतचा समांतर रस्ता, महात्मा गांधी मार्ग, पोलिस मुख्यालय ते क्रीडा संकुल चौक, जी. एस. मैदानासमोरील रस्ता, चित्रा चौक ते गणेश कॉलनी चौक, टॉवर चौक, जैन मंदिर, काँग्रेस भवन, पुष्पलता बेंडाळे चौक ते अजिंठा चौफुली या मार्गांवर हॉकर्सची संख्या वाढताना दिसत आहे. याशिवाय शहरातून गेलेल्या महामार्गावरील समांतर रस्त्यांवर, आकाशवाणी चौक ते महाबळ चौक, जिल्हाधिकारी निवासस्थान ते गिरणा पंपिंग रोड, शिवाजीनगर उड्डाणपूल ते गेंदालाल मिल, कानळदा रोड तसेच निमखेडी रोड व शहरातील वाढीव भागांमध्येही रस्त्यालगत व्यवसाय थाटण्याचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळी रस्ते बनतात ‘खुली हॉटेल्स’ सायंकाळच्या वेळेत खाद्यपदार्थांच्या गाड्यांभोवती ग्राहकांची गर्दी वाढते. त्यात रस्त्यावरच टेबल-खुर्च्या मांडल्या जात असल्याने काही ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग ग्राहकांच्या बसण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी होते. ग्राहकांची वाहनेच कोंडीचे कारण भाजी, फळे किंवा खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी ग्राहक रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी करतात. काही मिनिटांच्या खरेदीसाठी थांबलेली ही वाहने मागून येणाऱ्या वाहनांना अडथळा ठरतात आणि चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होते. टास्क फोर्ससमोर दुहेरी आव्हान महापालिकेने हॉकर्सच्या प्रश्नावर नियंत्रण ठेवण्यासाठी नुकताच टास्क फोर्स तयार केला आहे. मात्र, शहराच्या विविध भागांत वाढत जाणारी हॉकर्सच्या संख्येवर नियंत्रण मिळविणे. अधिकृत हॉकर्स व अनधिकृत विक्रेते यांच्यात फरक करून कारवाई करणे, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण ठेवणे व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणे, अशी दुहेरी जबाबदारी महापालिकेच्या टास्क फोर्ससमोर असणार आहे. बेशिस्त वाहनांचा वाहतुकीला अडथळा शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरत असलेले हॉकर्स सोबत रस्त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या वाहनाचादेखील मोठी समस्या आहे. यात भास्कर मार्केटचे दोन्ही बाजूंचे, जिल्हा रुग्णालयासमोर, सिंधी कॉलनी रस्ता, गोलाणी मार्केट, एम. जी. रोड, गोविंदा रिक्षा स्टॉप, बसस्थानक प्रवेशद्वार, सुभाष चौक, जुने बसस्थानक, टॉवर चौक आदी ठिकाणी बेशिस्त वाहनांचा त्रास दिसवसेंदिवस वाढत आहे. --------- नगरसेवकांची छुपी भागिदारी शहरात दिवसेंदिवस हॉकर्सची वाढती संख्या गंभीर समस्या बनतेय. प्रत्येक प्रमुख रस्त्यावर दररोज किमान एक-दोन हातगाड्यांची भर पडतेय. शहरातील हॉकर्सच्या (विविध खाद्यपदार्थ, फळ-भाजी विक्रेते) हातगाड्यांमध्ये काही नगरसेवकांची छुपती भागिदारी असल्याचे बोलले जातेय. माजी नगरसेवकाकडे डेली बाजार वसुलीचा मक्ता आहे, त्यामुळे त्याच्या आशीर्वादाने ही संख्या तर वाढतेच, शिवाय कारवाईतही हस्तक्षेप होतो. एका नगरसेवकाने सुमारे दोनशे गाड्या (खाद्यपदार्थ) भाड्याने दिल्याचे सांगितले जातेय. प्रभागांच्या कार्यक्षेत्रातील हॉकर्सकडून महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यासह त्या प्रभागातील नगरसेवकाचाही ‘हप्ता’ असतो, हे लपून राहिलेेले नाही. ------ (चौकट/ ग्राफीक्स करणे) असे रस्ते.. असे चौक.. असे हॉकर्स मुख्य बाजारपेठेत : २ हजारांच्या वर हॉर्कर्स फुले मार्केट परिसर : ३५० बळीराम पेठ परिसर : ७०० ते ८०० सुभाष चौकाचा भाग : ४०० ते ६०० उर्वरीत शहरात : १,५००वर हॉकर्स २०१४च्या सर्वेक्षणानुसार : २,९३३ हॉकर्स २०२२च्या नोंदीनुसार : ४,२६७ हॉकर्स मनपाकडे कागदपत्रे न दिलेले : ३,९०० हॉकर्स शहरातील एकूण हॉकर्स : ८ हजार (सुमारे) हंगामी हॉकर्स संख्या : १ हजार (काही कालावधीसाठी व्यवसाय करणारे) ---------- (चौकट) अशा आहेत अडचणी - अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हॉकर्सवर कारवाईसाठी अनेक वेळा वेगवेळ्या ठिकाणी सूचना येतात. त्यामुळे कोठे कारवाई करावी याचा पेच निर्माण होतो. - अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी कमी मनुष्यबळ व वाहनांची कमतरता. - शहरातील वाढीव भागातील मुख्य रस्त्यांसह अनेक रस्त्यांवर वाढत असलेले हॉकर्सची संख्या. ----- (चौकट) या उपाययोजना आवश्‍यक - चारही प्रभाग समितीनुसार अतिक्रमण निर्मूलन पथक तयार करणे. - दोन शिफ्टमध्ये पथकांची नियुक्ती होणे आवश्यक - नो हॉकर्स झोनमधील नोंदणीकृत हॉर्सला पर्यायी जागा देणे. - टाक्स फोर्समधील विविध विभागांचा समन्वय साधणे. ........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT