ॲंकर
शहर-जिल्हा कॉमन टुडे पान चारसाठी
-------------
NSK26H28874
जळगाव : जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यातील गुणवंतांसह शिक्षक व पदाधिकारी.
----------
कौशल्य विकासाला प्राधान्य देणे आवश्यक
--
किशोर राजे : जिल्हा विज्ञान मेळाव्यातून मृणाल व धनश्रीची विभागास्तरावर निवड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : ऊर्जानिर्मितीसोबतच वितरण, साठवणूक व अखंडित पुरवठा ही मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्य विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे यांनी केले.
शहरातील एमआयडीसी परिसरातील गुरुकुलम ग्लोबल स्कूलमध्ये शनिवारी(ता.५) आयोजित अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.राजे बोलत होते. दरम्यान, या मेळशव्यात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या मृणाल पाटील व धनश्री वाघमारे यांची नाशिक विभागीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड करण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व उपशिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या प्राचार्या वृषाली पाटील, प्रशासकीय अधिकारी ललित पाटील, सचिव सुनील वानखेडे, सदस्य भूपेंद्र पाटील, उल्हास पाटील, भाग्यश्री तळेले आदी उपस्थित होते.
सहा मिनिटे सादरीकरण
‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : संधी व आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांनी सहा मिनिटांचे सादरीकरण केले. फलक व संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विषय मांडला. परीक्षकांनी विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे विषयाचे आकलन व सखोल ज्ञान तपासले. यातून मृणाल पाटील व धनश्री वाघमारे या दोन विद्यार्थिनी विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीने अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले जाते.
विजेत्यांची नावे अशी
तालुका मेळाव्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा हा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. यात प्रथम क्रमांक मृणाल पाटील (स्वामीनारायण गुरुकुल माध्यमिक विद्यालय, सावदा), द्वितीय धनश्री वाघमारे (जे. टी. महाजन इंग्लिश मीडियम स्कूल, फैजपूर) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ बक्षीस दिव्यानी राजपूत (ग्रामविकास विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर), देवेंद्र पाटील (ए. बी. बॉय स्कूल, चाळीसगाव), निधी चावराई (सेंट अलॉयसिस हायस्कूल, भुसावळ) व मोहक साळुंखे (साने गुरुजी माध्यमिक विद्यालय, अमळनेर) यांनी मिळविला. या मेळाव्याचे परीक्षण अविनाश मोरे, प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, प्रा. राजेश देशमुख, डॉ. हेमंत नारखेडे व डॉ. पंकज सोनवणे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.