नाशिक

राष्ट्रवादीत कार्यकर्त्यांचा प्रवेश

CD
फोटो : H28940 नाशिक : पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, संतोष भागवत, नजर शहा, सागर भारस्कर, संजय बोडके, शेरखान पठाण आदी … राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश सकाळ वृत्तसेवा नाशिक ता. ६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी प्रभावित होत अनेक कार्यकर्त्यांनी या पक्षात प्रवेश केला. शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. ६) मुंबई नाका परिसरातील पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विकासकामांना प्राधान्य दिले आहे. राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिकमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविला. तसेच नाशिकमधील विकास कामांविषयी त्यांचा दृष्टीकोन शहराला विकासाच्या मार्गावर घेऊन जात असल्याचे रंजन ठाकरे यांनी प्रवेश सोहळ्यात सांगितले. यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, संतोष भागवत, वाहतूक शहराध्यक्ष नजर शहा, सागर भारस्कर, संजय बोडके, शेरखान पठाण उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, पक्षातील छोटे किंवा मोठे असे नसते. तर त्याच्या कार्याला महत्त्व असते. आपल्या कामाने आपली ओळख निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे नागरिकांमध्ये सद्भावना निर्माण होईल, अशा स्वरूपाचे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सिद्धार्थ बस्ते यांनी सामाजिक न्याय सेलमध्ये तर आकील खान, शहराध्यक्ष अच्युत मोकळ, जितेंद्र काळे, वैभव धुर्जड, अशोक बिरारी, जालमसिंग राजपुरोहित, अंकुश खंडारे, हनुमंत नलावडे, राहुल चव्हाण, विनोद धोत्रे यांनी अवजड वाहतूक सेलमध्ये प्रवेश केला.रजा शेख, सलीम शेख, गणेश आहेर, राजेंद्र भाबड, जयेश अहिरे, राहील इनामदार, तोहिद शेख, उमेश पाटील, सकलेन पठाण, विकास शिंदे, बाळासाहेब जगताप, संतोष जाधव, समाधान राठोड, सागर टिले, गणेश माळूजकर, अनिकेत गिते यांनी रिक्षा, टॅक्सी व शालेय वाहतूक संघटनेत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

SCROLL FOR NEXT