नाशिक

शहर परिसरातून तीन दुचाक्या लंपास

CD
शहर परिसरातून तीन दुचाकींची चोरी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : उपनगरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या असून, गोदाघाटावरून तर भरदिवसा दुचाकी लंपास केली आहे. रामतीर्थ परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्याची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. किरण प्रभाकर जाधव (रा. समाजकल्याण मुलांचे हॉस्टेल, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता.४) सायंकाळी त्यांनी दुचाकी (एमएच- ४१- एएक्स- २३०३) रामतीर्थाजवळील संत देवमामलेदार समाधी मंदिरासमोरील यशवंत पटांगण येथे पार्क केली होती. दर्शन घेऊन परत आल्यावर गाडी गायब असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, सहायक उपनिरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत. इंदिरानगर परिसरातील शरयूनगरी येथून घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेली. भगत कल्पनाथ सहानी यांच्या तक्रारीनुसार, ३० ऑगस्टला रात्री दुचाकी (एमएच १५ एफडी ७६०८) चोरीला गेली. इंदिरानगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार डोळस तपास करीत आहेत. तर, बोधलेनगर येथील आरटीओ कॉलनीतील पंचअमृत सोसायटीच्या आवारात पार्क केलेली दुचाकी चोरट्याने लांबवली. ​सुरेश ईश्वरदास गेहाणी यांनी शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी साडेसहाला दुचाकी (एमएच १५ एचजे ३६६०) घरासमोर पार्क केली असता, चोरी झाली केली. याप्रकरणी उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT