नाशिक

गुणवंत विद्यार्थ्यांचा जळगाव पीपल्स बँकेतर्फे गौरव

CD
NSK26H28943 जळगाव : पीपल्स बँकेतर्फे आयोजित सोहळ्यात भरत अमळकर यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना श्लोक नैनेश सोनी व पालक. सोबत अनिकेत पाटील, राजू बाविस्कर, बँकेचे संचालक व पदाधिकारी. ---------- जळगाव पीपल्स बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : येथील जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवारी (ता.६) यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक राजू बाविस्कर उपस्थित होते. गेल्या मार्चमध्ये विविध शैक्षणिक परीक्षा व पदव्या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या बँकेच्या सभासद व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांमधील १२८ गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे १५०१, १००१ व ७५१ रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व डॉ. सुरेश हावरेलिखित पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपेक्षा ज्ञानाचा उपयोग, सातत्य व समाजाच्या प्रगतीत योगदान यांना महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. श्री. अमळकर यांनी विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार कौशल्ये आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. श्री. बाविस्कर यांनी पालक-विद्यार्थी यांच्यातील संवाद व योग्य क्षेत्राची निवड महत्त्वाची असल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन बँकेच्या व्यवस्थापक नीता वारुळकर यांनी केले. बँकेचे संचालक, अधिकारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT