नाशिक

वैद्यकीयच्‍या अवघ्या २ हजार ६४५ जागा रिक्‍त

CD
सर्व आवृत्त्यांसाठी ------------ ‘वैद्यकीय’च्‍या अवघ्या दोन हजार ६४५ जागा रिक्‍त --- ‘एमबीबीएस’, ‘बीडीएस’ला पहिल्‍या फेरीत ७५.१५ टक्‍के जागांवर प्रवेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ ः सध्या सुरू असलेल्‍या वैद्यकीय शाखेच्‍या पदवी अभ्यासक्रमास प्रथम वर्ष प्रवेशाच्‍या पहिल्‍या फेरीत राज्‍यात ७५.१५ टक्‍के जागांवर प्रवेश झाले आहेत. एकूण आठ हजार एक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, यापैकी एक हजार ३१७ विद्यार्थ्यांनी जागा ‘फ्रीज’ केल्‍या. सहा हजार ६८४ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला. या फेरीनंतर आता दुसऱ्या फेरीसाठी अवघ्या दोन हजार ६४५ रिक्त जागा उपलब्‍ध आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणांतर्गत असलेल्या एमबीबीएस व बीडीएस पदवी अभ्यासक्रमाच्या राज्याच्या कोट्यांतर्गत केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत दोन्ही अभ्यासक्रमांच्या १० हजार ६४६ जागा उपलब्ध होत्या. ‘एमबीबीएस’च्या आठ हजार १२९ पैकी सहा हजार ८७६ म्हणजे ८४.५८ टक्‍के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले व एक हजार २५३ जागा रिक्त आहेत. यात राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या चार हजार ९८० जागांपैकी चार हजार ६६५ जागांवर अर्थात ९३.६७ टक्‍के विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ४१५ जागा रिक्त आहेत. प्रवेश घेतलेल्‍यांपैकी ८८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जागा ‘फ्रीज’ केल्या आहेत. तीन हजार ६७७ विद्यार्थ्यांनी जागा ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील तीन हजार १४९ पैकी दोन हजार ३११ जागांवर प्रवेश झाले असून, ८३८ जागा रिक्त आहेत. ‘बीडीएस’च्या दोन हजार ५१७ पैकी एक हजार १२५ जागांवर प्रवेश झाले असून, एक हजार ३९२ जागा रिक्त आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘बीडीएस’च्या ३१७ जागांपैकी १९६ वर प्रवेश झाले. १२१ जागा रिक्त आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयात ‘बीडीएस’च्या दोन हजार २०० पैकी ९२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, एक हजार २७१ जागा रिक्त आहेत. ---------- इन्‍फोः दुसऱ्या फेरीची आजपासून प्रक्रिया एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार दुसऱ्या फेरीसाठी रिक्‍त असलेल्‍या जागांचा तपशील सोमवारी (ता. ७) जाहीर केला जाईल. यानंतर मंगळवार (ता. ८) ते गुरुवार (ता. १०)दरम्यान विद्यार्थी प्राधान्यक्रम भरतील. शनिवारी (ता. १२) जागावाटप जाहीर केले जाईल. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT