धुळे : टुडे पान ४ साठी...
--
फोटो क्रमांक : 28947
साक्री : बस अपघातातील जखमी विद्यार्थीनीची विचारपूस करताना अल्पा अग्रवाल. शेजारी ॲड. पूनम काकुस्ते-शिंदे.
--
बस अपघातातील विद्यार्थिनींना शासकीय मदतीचे आश्वासन
--
देसले हॉस्पिटलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांकडून प्रकृतीची विचारपूस
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ६ : मानव विकास योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या धुळे आगाराच्या (एमएच ०६ एस ८५८९) बसला देऊर ते म्हसदी महामार्गावरील वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. चार सप्टेंबरला सकाळी पावणेआठच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात बसमधील ४५ प्रवाशांपैकी सुमारे ३० विद्यार्थिनी आणि दोन महिला जखमी झाल्या.
अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने साक्री व म्हसदी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत झालेल्या मीनाक्षी गुलाब पाटील व हर्षदा या दोन विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी साक्री येथील देसले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील मीनाक्षी पाटील हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, दोघांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रदेश प्रभारी अल्पा अनुप अग्रवाल आणि महिला आघाडीच्या साक्री तालुका अध्यक्ष ॲड. पूनम काकुस्ते- शिंदे यांनी देसले हॉस्पिटलला भेट दिली. त्यांनी जखमी विद्यार्थिनींची विचारपूस करून डॉक्टरांकडून प्रकृतीची माहिती घेतली व पालकांना धीर दिला. या वेळी अल्पा अग्रवाल व ॲड. पूनम काकुस्ते- शिंदे यांनी शासन जखमी विद्यार्थिनींच्या पाठीशी आहे. विद्यार्थिनींच्या पुढील उपचारासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक त्या सर्व सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाठपुरावा करतील, असे आश्वासन विद्यार्थिनीना दिले. या भेटीदरम्यान रुग्णालयात डॉ. मंगला देसले, डॉ. स्वप्निल भदाणे, डॉ. कोमल अहिरराव आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.