नाशिक

उज्जैनच्या धर्तीवर गोदाघाटावर उभारणार स्टीलचे रेलिंग

CD
मेन सकाळ विशेष/सिंहस्थ लोगो वापरावा) ..... उज्जैनच्या धर्तीवर गोदाघाटावर उभारणार स्टीलचे रेलिंग लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिसांचा विशेष अ‍ॅक्शन प्लॅन नरेश हाळणोर : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ व गोदाघाटावर भाविकांची होणारी प्रचंड गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. शाही स्नानाच्या पर्वणीकाळात लाखो -करोडो भाविक एकाच वेळी गोदावरी पात्रात उतरतात. या काळात कोणतीही चेंगराचेंगरी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर गोदाघाटावर भक्कम स्टीलचे रेलिंग उभारण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना अधिक सुरक्षितता लाभणार आहे. उज्जैन येथील धार्मिक उत्सवांमध्ये आणि महाकाल मंदिर परिसरात अरुंद जागा असतानाही गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टील रेलिंगचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे ठिकाणी दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. प्रयागराज, हरिद्वार याठिकाणी काहीशी प्रशस्त जागा व विस्तारलेले पात्र आहे. त्या तुलनेत उज्जैन आणि नाशिक येथील जागा अरुंद असते. या दोन्ही ठिकाणे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने मोठ्या संख्येने गर्दी सामावून घेण्याची क्षमता नाही. यातून कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी उज्जैन येथे व्यवस्थापनाने गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी स्टीलचे रेलिंग बसविले. यामुळे रेलिंगमधून भाविक येतात आणि जातात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवितानाच सुलभ व्यवस्थापन करणे शक्य झाले. याच मॉडेलचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी शहर पोलिसांच्या एका विशेष पथकाने दोन ते तीन वेळा उज्जैनचा दौरा केला. तेथील प्रवेश आणि निर्गम मार्ग, बॅरिकेटींगची रचना आणि पोलीस बंदोबस्ताचे नियोजन समजून घेतल्यानंतर नाशिकच्या गोदाघाटासाठी हीच यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे. --- ​गोदाघाटावरील संभाव्य धोके व आव्हाने * सिंहस्थ पर्वणीच्या वेळी गोदावरी नदीपात्रात दुथडी भरून पाणी असते. रामतीर्थ व लगतच्या घाटांची रचना पाहता, पायऱ्यांचा भाग काही ठिकाणी अरुंद आणि तीव्र उताराचा आहे. अशा वेळी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यास पाठीमागून येणाऱ्या गर्दीच्या दाबामुळे पुढे अपघात घडण्याची शक्यता असते. * पायऱ्यांवरून उतरताना घसरून पडणे किंवा चेंगराचेंगरी होण्याचा मोठा धोका असतो. * गर्दी एकाच वेळी एकाच मार्गाने पात्रात उतरल्यास नियंत्रण मिळवणे कठीण जाते. -- ​सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचे मुख्य फायदे * ​रांगेतून नियंत्रित प्रवेश : गोदाघाटाच्या पायऱ्यांवर स्टीलच्या भक्कम रेलिंगच्या मार्गिका तयार केल्या जातील. यामुळे भाविकांना एका वेळी दोन किंवा तीनच्या रांगेतच घाटावर आणि पात्रात सोडणे शक्य होईल. * अचानक होणाऱ्या गर्दीला अटकाव : एकाच वेळी हजारो भाविक घाटावर उतरू शकणार नाहीत, ज्यामुळे गर्दीचा टप्पा विभागला जाईल आणि चेंगराचेंगरीच्या शक्यतेवर मात करता येईल. *ज्येष्ठ व बालकांसाठी सुरक्षित आधार : पात्रात उतरताना आणि बाहेर पडताना पायऱ्यांवर पाणी असल्याने घसरगुंडी होण्याची भीती असते. अशा वेळी स्टील रेलिंगचा मजबूत आधार लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध भाविकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. ​* आपत्कालीन स्थिती हाताळणे सोपे : गर्दीचा भार वाढल्यास सुरक्षा यंत्रणांना रांगेच्या मधोमध थांबून प्रवाह नियंत्रित करणे किंवा आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना सुरक्षित बाहेर काढणे सोपे जाणार आहे. -- ​मनपा - पोलिसांचे संयुक्त नियोजन - पोलिस आणि महापालिका प्रशासनातर्फे या प्रकल्पाचा आराखडा तयार केला जात आहे. घाटाचे सौंदर्य बाधित न होता आणि स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास न होता ही भक्कम स्टील रेलिंग कशी बसवता येईल, यावर अंतिम टप्प्याचे नियोजन सुरू आहे. आगामी कुंभमेळ्यात एकही दुर्घटना घडणार नाही, असा विश्वास पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. --- कोट फोटो : H28949 पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थाचे सुक्ष्म नियोजन सुरू आहे. कोणतीही दुर्घटना न घडता सिंहस्थ पार पाडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. त्यासाठी प्रयागराज आणि उज्जैनचे पोलिस अधिकाऱ्यांनी दौरे केले आहेत. उज्जैन येथील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टील रेलिंग व नियोजनाच्या अनुषंगाने शहर पोलिसांच्या विशेष पथकाने दौरा करून पाहणी केली. त्याच धर्तीवर गोदाघाटावर नियोजन करणे शक्य आहे. - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

Yoga For Everyone: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांसाठी 'ही' आहेत सर्वोत्तम योगासने! आरोग्य अन् मानसिक शांतीची पक्की गॅरंटी...

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

SCROLL FOR NEXT