नाशिक

संत गुरु रविदास महाराज जयंतीनिमित्त समरसता संकल्प अभियान

CD
NSK26H28963 जळगाव : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त समरसता संकल्प अभियानाअंतर्गत जन्मभूमीची पवित्र माती असलेल्या कलशाचे भाजप पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करताना आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, आनंद सपकाळे आदी. --------------- जळगावात समरसता संकल्प अभियान ----- संत गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : शिरोमणी संत श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर समरसता संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २६ जुलै २०२६ (गुरुपौर्णिमा) ते २० फेब्रुवारी २०२७ (माघ पौर्णिमा) या कालावधीत हे अभियान विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत समरसता दीप महोत्सव, कलश वंदन अभियान, श्री गुरु रविदास महाराज वसतिगृह संपर्क अभियान व श्री गुरु रविदास महाराज समरसता यात्रा असे विविध कार्यक्रम जळगाव शहरातील प्रत्येक प्रभागांत आयोजित करण्यात येत आहेत. श्रीसंत रविदास महाराज यांच्या जन्मभूमीची पवित्र माती घेऊन निघालेली कलश यात्रा नागपूर व छत्रपती संभाजीनगरमार्गे जळगाव येथे दाखल झाली. नुकताच हा पवित्र कलश जी. एम. फाउंडेशन येथील भाजप कार्यालयात भाजप मंडळ क्रमांक १, छत्रपती शिवाजीनगर मंडळाचे अध्यक्ष आनंद सपकाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कलश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. हा पवित्र कलश जळगाव शहरातील भाजपच्या पाचही मंडळांमध्ये नेण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी संत गुरु रविदास महाराज यांच्या जीवनकार्याला उजाळा देत कलशाचे पूजन करण्यात येणार आहे. या संपूर्ण ‘समरसता संकल्प अभियानाची’ जबाबदारी संयोजक शिरीषकुमार तायडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT