नाशिक

ओंकारेश्वर मंदिरात आज श्रावण सोमवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

CD
शहर टुडे पान चारसाठी --------- श्री ओंकारेश्वर मंदिरात आज विविध कार्यक्रम ------- श्रावण सोमवारनिमित्त १०८ निरंजन्यांनी महाआरती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : दक्षिण भारतीय पद्धतीनुसार चतुर्थ श्रावण सोमवारनिमित्त शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री ओंकारेश्वर मंदिर सोमवारी (ता.७) दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. यानिमित्त मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी स्वतंत्र पाईप रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईहून आणलेल्या विशेष फुलांनी भगवान शिवांचा नयनरम्य शृंगार करण्यात येणार आहे. सकाळी पाच ते सात या वेळेत शिवअभिषेक पूजन, तर सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत शिवषोडशोपचार अभिषेक पूजन होईल. दुपारी बाराला अभिजित मुहूर्तावर १०८ निरंजन्यांनी महाआरती होणार आहे. यानंतर दुपारी साडेबारा ते चार या वेळेत श्री लघुरुद्र अभिषेक पूजन, तर सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत शिवरुद्राभिषेक पूजन होईल. सायंकाळी ६.१५ वाजता १०८ निरंजन्यांनी सायंआरती होणार आहे. रात्री ९.३० ते मध्यरात्री १२ या वेळेत श्री सत्संग भजन मंडळ जळगाव यांच्यातर्फे सुश्राव्य शिवभजनांचा कार्यक्रम होणार आहे. दिवसभर भाविकांसाठी विशेष प्रसादाचे अखंड वितरण करण्यात येणार असून, सायंकाळी दीपदर्शनासाठी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. भाविकांनी भगवान ओंकारेश्वराचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा व्यवस्थापक दीपक गजानन जोशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

SCROLL FOR NEXT