नाशिक

काँक्रिट रस्‍त्‍यांची आयआयटीच्‍या तज्‍ज्ञांकडून पाहणी

CD
सेकंड मेन फोटो : H28971 नाशिक : रस्‍तेकामाची पाहणी करताना आयआयटी, पवई या संस्‍थेतील तज्‍ज्ञांचे पथक. --------------- काँक्रिट रस्‍त्‍यांची ‘आयआयटी’कडून पाहणी ‘कोअर कट’ द्वारे प्राथमिक तपासणी; विविध ठिकाणी भेटी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : शहरात सुरु असलेल्‍या रस्‍ते उभारणी कामांची गुणवत्ता तपासणीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी), पवई येथील तज्‍ज्ञांनी भेट दिली. विविध तीन प्रमुख रस्त्यांची पाहणी करताना काँक्रिट रस्त्याचा कोअर कट घेऊन प्रत्यक्ष जाडीची व इतर प्राथमिक तपासणी केली. सिंहस्‍थ कुंभमेळ्याच्‍या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्‍या कामांमध्ये सर्वात महत्त्वाच्‍या असलेल्‍या नाशिक ते त्र्यंबकेश्‍वर रस्‍त्‍याचा पाहणीमध्ये समावेश होता. खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नल, पिंपळगाव बहुला आणि गरवारे ते एक्स्लो पॉइंट या तीन रस्त्यांचा पाहणीमध्ये समावेश होता. रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष स्थिती, काँक्रिटची गुणवत्ता तसेच बांधकामासंदर्भातील तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी कोअर कट घेतले. यातून रस्त्याच्या आतील भागातील काँक्रिटच्या थराची तपासणी करत, प्रत्यक्ष जाडी मोजली. प्राथमिक तपासणीनुसार तांत्रिक मानकांनुसार काम योग्य असल्याचे आढळले. तसेच इतर काम सुरु असलेल्या काही भागांमध्ये पाहणी केली. पावसाळ्याच्‍या पार्श्वभूमीवर पावसाळी पाण्याचा निचरा, वाहतूक नियोजन आदी बाबींवर चर्चा झाली. महापालिकेकडून रस्ते कामांच्या गुणवत्तेसाठी अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेसोबत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व तृतीय-पक्ष गुणवत्ता तपासणीची कार्यपद्धतीही अवलंबली जात असल्‍याची माहिती यावेळी दिली. स्वतंत्र तांत्रिक संस्थांच्या माध्यमातून कामांची नियमित तपासणी केली जात असल्‍याचेही सांगितले. पाहणीदरम्यान महापालिकेचे अभियंता नितीन पाटील आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, रवींद्र पाटील, नीलेश साळी, हेमंत नांदुर्डीकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT