नाशिक

पतसंस्था फेडरेशन शिबिर

CD
धुळे टुडे १ साठी... --- फोटो- NSK26H28967 धुळे : जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण शिबिराचे दीपप्रज्वलन करुन उद्‌घाटन करताना गोपाळराव केले. शेजारी लक्ष्मीकांत शहा, डॉ. दरबारसिंह गिरासे व इतर मान्यवर. --- पतसंस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची गरज --- लक्ष्मीकांत शहा; जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे प्रशिक्षण शिबिर सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : नागरी व ग्रामीण क्षेत्रात शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरीकांना पतसंस्था अर्थपुरवठा करत असते. म्हणून पतसंस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेची गरज आहे. त्यातून नागरीकांचा आर्थिक विकास होत आहे. हेच सहकार क्षेत्राचे उत्तम यश आहे, असे प्रतिपादन जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा यांनी केले. धुळे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच झाले. फेडरेशनचे संस्थापक ॲड. झेड. बी. पाटील, सहकारमहर्षी विखे पाटील यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. श्री. शहा अध्यक्षस्थानी होते. फेडरेशनचे गटनेते गोपाळराव केले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी राज्य फेडशन नाशिक विभागीय उपाध्यक्ष गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. भास्कर पाटील, कार्यकारी संचालक उदय शिनकर, देविदास पाटील, डॉ. दरबारसिंह गिरासे, सुरेश जैन, कैलास गोगड, शरद पाचपुते, उषा साळुंखे, सर्जेराव पाटील, नरेंद्र अहिरराव आदी उपस्थित होते. पतसंस्थांनी थकबाकी वसूलीसाठी संचालक मंडळ, कर्मचाऱ्यांनी समन्वयांतून काम करावे व त्यासाठी जिल्हा पतसंस्था फेडरेशन मार्गदर्शकाची भूमिका घेत असल्याचे श्री. शहा म्हणाले. मान्यवरांचे मार्गदर्शन पतसंस्थांचे थकीत कर्ज एनपीएत येऊ नये, यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी यांनी समन्वय साधून मार्ग काढवा. कर्जदार व पतसंस्था यांचे उत्तम समन्वय हेच कर्ज एनपीएत जाणार नाही, असे मत सुशांत वाडीले यांनी मांडले. कमलाकर जोशी यांनी कर्डा वसूली प्रक्रिया सॉफ्टवेअरची माहिती सादर केली. पतसंस्थासाठी हे अतिशय महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. जावेद एस. बेपारी यांनी डीजिटल/ इलेक्ट्रानिक्स सुरक्षा याचा डेमो स्टेशन सादर करून इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सुरक्षेचे महत्व गरजेचे असल्याचे सांगितले. फेडरेशनचे सचिव बी. टी. देवरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक रवींद्र वाणी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक गोकुळ पाटील, विलास बोरुडे, विजय सोनगिरे, निलेश जयस्वाल, म्हसाई माता पतसंस्था निजामपूर, सतीदेवी पतसंस्था बोराडी आदी पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT