नाशिक

३ हजार विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती

CD
ॲंकर शहर-जिल्हा कॉमन टुडे पान चारसाठी ------------- NSK26H28976 जळगाव : जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी व ‘सकाळ एनआयई’तर्फे आयोजित शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती साकारल्या. ---- NSK26H28979 जळगाव : सकाळ एनआयई- रोटरी क्लब ग्रीनसिटीतर्फे आयोजित शाडूमाती गणेशमूर्ती कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित आमदार सुरेश भोळे, क्लबचे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, ‘सकाळ’चे ब्युरो चीफ सचिन जोशी, रोटरी जळगाव ग्रीन सिटीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, दिनेश थोरात आदी. ---- NSK26H28981 जळगाव : शाडूमातीपासून मुर्ती तयार करतांना विद्यार्थी. ------ तीन हजार विद्यार्थ्यांनी घडविल्या शाडूमातीच्या गणेशमूर्ती ----- उपशीर्षक सकाळ एनआयई-रोटरी ग्रीनसिटीचा उपक्रम; ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : ‘स्वतःची मूर्ती स्वतः घडवा व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा’ या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटी व ‘सकाळ एनआयई’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता.६) भव्य पर्यावरणपूरक शाडूमाती गणपती कार्यशाळा घेण्यात आली. प. न. लुंकड कन्या शाळा व शेठ ला. ना. विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यशाळेत तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी शाडूमातीच्या गणेशमूर्ती साकारल्या. या उपक्रमाची ‘द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाली. या कार्यशाळेत ३५ प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. शाडूमाती मळण्यापासून गणेशमूर्तीला आकार देणे, अवयवांची रचना व अंतिम सजावट करण्यापर्यंतची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अनुभवली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी शाडूमातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड. सुशील अत्रे होते. आमदार सुरेश भोळे, अभिजित देशपांडे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे डिस्ट्रिक्ट प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, ‘द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’चे प्रशासन अधिकारी इंद्रजीत मोरे, ‘सकाळ’चे ब्युरो चीफ सचिन जोशी, रोटरी जळगाव ग्रीन सिटीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्प प्रमुख दिनेश थोरात, ‘सकाळ एनआयई’ समन्वयक आशुतोष पाटील, डॉ. पूजा वाघ, प्रा. अभय कुलकर्णी, डॉ. आकांक्षा कुलकर्णी, डॉ. केतन वाघ यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतःच्या हाताने मूर्ती साकारल्याने पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून प्रभावीपणे देण्यात आला. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT