नाशिक

गवार १६० रुपये किलो; फळभाज्या महाग, पालेभाज्या स्वस्त

CD
कानोसा बाजारपेठेचा --- गवार १६० रुपये किलो; फळभाज्या महाग, पालेभाज्या स्वस्त वेलवर्गीय भाज्या कवडीमोल भावाने; कांदा-बटाटा आवाक्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : पावसाची अधूनमधून लागणारी हजेरी आणि वातावरणातील बदलांचा परिणाम भाजीपाल्याच्या बाजारावर दिसून येत आहे. सध्या नाशिकच्या बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक चांगली असल्याने त्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, काही फळभाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींच्या स्वयंपाकघरातील बजेटवर परिणाम होत आहे. विशेषतः गवारीचा दर तब्बल १६० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने ही भाजी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सध्या बाजारात मेथीची जुडी १० रुपये, तर कोथिंबीर, पालक आणि शेपू प्रत्येकी २० रुपये जुडी मिळत आहेत. कांदापातीचा दर ३० रुपये जुडी आहे. त्यामुळे पालेभाज्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, गवार आणि भुईमुगाच्या शेंगांचे दर चांगलेच वाढले आहेत. भुईमुगाच्या शेंगा सध्या सुमारे १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. फळभाज्यांमध्येही काही प्रमाणात दरवाढ झाली असली, तरी टोमॅटो आणि भेंडीचे दर तुलनेने स्थिर आहेत. दोन्ही भाज्या सध्या ३० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. वेलवर्गीय भाज्यांची आवक वाढल्याने त्यांच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. वेलवर्गीय भाज्यांमध्ये घेवडा, पापडी वाल, कारले, दोडके, गिलके या २५ ते ३० रुपये पावशेर भावाने मिळत आहेत. गवारीचे दर आगामी काळातही असेच राहिल्यास महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या पितृपक्षाच्या पार्श्वभूमीवर गृहिणींना भाजीपाल्याचे बजेट सांभाळताना कसरत करावी लागू शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत आवक वाढून गवारीसह महागलेल्या भाज्यांचे दर कमी होतात का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT