नाशिक

पेंडिंग- सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे

CD
पेंडिंग बातमी..... आज अवश्‍य घ्यावी.... ERN26B05351 एरंडोल ः बैठकीत मार्गदर्शन करताना अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते. शेजारी नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन व पदाधिकारी. सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे अशोक नखाते ः एरंडोल येथे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन सकाळ वृत्तसेवा एरंडोल, ता. ६ ः सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करताना सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गणेश मंडळांचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष देविदास महाजन अध्यक्षस्थानी होते. गणेशोत्सवानिमित्त मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, पालिका व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांची संयुक्त बैठक पालिकेच्या अभ्यासिकेत आयोजित करण्यात आली होती. बैठकीत गणपती स्थापना व विसर्जन मिरवणूक मार्गावर खोदण्यात आलेले खड्डे, रस्त्यावरील अतिक्रमणे, प्रमुख मार्गावर उभी करण्यात येणारी अवजड वाहने, खंडीत होणारा वीजपुरवठा, रस्त्यावरील ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ यासह विविध समस्या सोडवण्याची मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, मद्यपान करू नये, उत्सवाचे पावित्र्य जपावे असे आवाहन केले. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी पालिकेतर्फे सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील असे सांगून मूर्ती विसर्जनासाठी तीन ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण केले जाणार असल्याचे सांगितले. माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, निवृत्त तहसीलदार अरुण माळी, माजी नगरसेवक विजय महाजन, जगदीश ठाकूर, राजेंद्र महाजन, परेश बिर्ला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एस. एस. महाजन यांनी सूत्रसंचलन तर पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी आभार मानले. बैठकीला माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, किशोर निंबाळकर, रमेश परदेशी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, निवासी नायब तहसीलदार संजय घुले, उपनगराध्यक्ष कृष्णा ओतारी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे गटनेते प्रा. मनोज पाटील, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री. गेडाम, नगरसेवक मयूर महाजन, अतुल महाजन, माजी उपनगराध्यक्ष जहिरोद्दिन शेख, ॲड. अहमद सय्यद, ॲड. ईश्वर बिऱ्हाडे, पालिकेचे कार्यालय अधीक्षक एस. आर. ठाकूर, ‘मनसे’चे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, सचिन महाजन आदी उपस्थित होते. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT