नाशिक

वीज कर्मचारी आयसीयूत

CD
धुळे टुडे १ साठी... --- मारहाणीत बीपी वाढल्याने वीज कर्मचारी ‘आयसीयू’त --- धुळ्यात दोन भावांवर गुन्हा दाखल --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत रक्तदाब वाढल्याने कर्मचाऱ्यास थेट आयसीयूमध्ये दाखल करावे लागल्याची गंभीर घटना शनिवारी (ता. ५) धुळ्यात घडली. याप्रकरणी दोन भावांवर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महावितरणच्या लालबाग शाखेचे कनिष्ठ कार्यालयीन सहायक राजेंद्र वाघ व वरिष्ठ तंत्रज्ञ वासुदेव मालचे हे ५ सप्टेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील गल्ली नंबर-५ जे. बी. रोड कॉर्नर, जिनगर गल्लीजवळील अजिंक्य हॅण्डलूम या दुकानात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत एनसीसी या स्मार्ट मीटर एजन्सीचे यशवंत दुसाने व नीलेश ठाकूर हे कर्मचारी होते. या ठिकाणी अशोक खंडू वाणी (पिंगळे) या नावाने वीजजोडणी आहे. तेथे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी मोटारसायकलवर संतोष अशोक पिंगळे व अमोल अशोक पिंगळे आले. अमोलने वाघ यांना शिवीगाळ करत ‘तुम्ही मीटर कसे व कोणाला विचारून बदलत आहात’ अशी विचारणी केली. त्यावर वाघ यांनी संतोष यानेच बिल नीट येत नसल्याची तक्रार दिली होती. आता मीटर बदलण्याच्या यादीत तुमचे नाव आल्याचे सांगितले. मीटर बदलायचे नसेल तर तुम्ही साहेबांशी बोलून घ्या असेही सांगितले. त्यावर अमोल पिंगळेने वाघ यांच्या कानफटात मारली तसेच जिवे मारण्याचीही धमकी दिली तर संतोषने वाघ यांच्या खांद्याला जोराचा धक्का दिला. नंतर वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले. तेथेही अमोल पिंगळेने धमकी दिली. दरम्यान, मारहाणीच्या धक्क्याने वाघ यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन वाघ यांचा जबाब नोंदवला. त्यावरून संतोष अशोक पिंगळे व अमोल अशोक पिंगळे यांच्यावर आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती महावितरणने दिली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT