नाशिक

धुळे वाळू उपसा

CD
धुळे ः टुडे १ साठी, मेन - फोटो क्रमांक ः 28995 धुळे : अवैध वाळू वाहतूक करणारे विनानंबर प्लेटचे डंपर. - अवैध वाळू उपशातून रोज ५० लाखांची लूट - विनानंबर प्लेटच्या डंपर्सने वाहतूक; महसूल, आरटीओ, पोलिसांकडून झोपेचे सोंग सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ६ : जिल्ह्यातील वाळू तस्करीच्या प्रकारांनी गंभीर वळण घेतले असून या अवैध व्यवसायातून रोज तब्बल ४५ ते ५० लाख रूपयांची खुलेआम लूट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वाळू तस्करांनी महसूल यंत्रणा, आरटीओ कार्यालय आणि पोलिसांशी संधान साधल्याशिवाय हा बेकायदेशीर उद्योग चालू शकत नाही, असा निष्कर्ष धुळेकर काढत आहेत. धक्कदायक म्हणजे आजही अनेक विनानंबर प्लेटच्या, तसेच एकाच नंबर प्लेटच्या अनेक डंपर्सने रात्री- अपरात्री खुलेआम ही वाहतूक सुरू असूनही महसूल, आरटीओ, पोलिस यंत्रणा दुर्लक्ष कसे करू शकते? या गंभीर स्थितीची जबाबदार यंत्रणेकडून दखल घेतली जात नसल्याने अनेक त्रस्त ग्रामस्थांनी नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रारी करण्यास सुरूवात केली आहे. - कर्तव्याची ऐशी- तैशी राज्य शासनाच्या वाळू धोरणानुसार पावसाळ्यामुळे १० जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत वाळू उत्खननास बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत नदीचे पात्राचे नुकसान होऊ नये, पाण्याचा प्रवाह बदलू नये आणि वन्यजीव, नदीतील जैवविविधतेच्या रक्षणार्थ असा निर्णय शासनाकडून घेतला जातो. त्यानुसार जिल्हाधिकारी, गौणखनिज अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, पोलिस पाटील आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्थापन होणाऱ्या भरारी पथकांनी आरटीओ आणि पोलिसांच्या मदतीने या शासकीय धोरणाच्या रक्षणार्थ प्रामाणिकपणे कर्तव्यपार पाडावे, असे राज्य शासनाला अभिप्रेत आहे. नेमक्या याच उद्दीष्ट्याला धुळे जिल्ह्यात छेद दिला जात असल्याचे अधोरेखीत होत आहे. - विनानंबर प्लेट डंपर्स वाळू तस्करांनी धुळे तालुक्यातील पांझरा नदी, शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी आणि शिंदखेडा, शिरपूर तालुक्यातील तापी नदीपात्राला लक्ष्य केले आहे. या क्षेत्रातील न्याहळोद, नेर, कुसुंबा, आनंदखेडे (ता. धुळे), चिमठाणे, अक्कडसे, बेटावद- मांडळ, वालखेडा (ता. शिंदखेडा), उपरपिंड (ता. शिरपूर) आदी ठिकाणी रोज सरासरी दीडशे ते दोनशेहून अधिक ट्रक्टरव्दारे बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. ट्रक्टरने दिवसाढवळ्या आणि विशेषतः रात्री- अपरात्री मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केल्यानंतर तस्करांनी सांगितलेल्या नियोजीत स्थळी ते ट्रक्टर पोहोचतात आणि डंपर भरतात. यानुसार रोज सरासरी १०० ते ११० डंपर वाळूचे भरले जात आहेत. यात गंभीर बाब म्हणजे तस्करांकडून विनानंबर प्लेटच्या अनेक डंपर्सव्दारे खुलेआम अवैध वाळूची बेकायदेशीरपणे वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक रात्री- अपरात्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. (क्रमशः) - १४-१ ...चौकट... १४-१ अवैध वाळू लुटीमागचे गणित एका ट्रक्टरमध्ये सरासरी एक ते सव्वा ब्रास वाळू असते. असे सरासरी सहा ते सात ट्रक्टराव्दारे वाळू एका डंपरमध्ये भरली जाते. एक ब्रास म्हणजे सरासरी चार टन होय. याप्रमाणे सात ब्रास म्हणजे २८ टन होय. प्रत्यक्षात डंपर ओव्हरलोड भरला जातो. यानुसार एका डंपरमध्ये सरासरी ३५ ते ४० टनपर्यंत वाळू भरली जाते. जिल्ह्यातून बेकायदेशीरपणे रोज १०० ते ११० डंपर्सची वाहतूक केली जाते. त्यानुसार एकूण रोज सुमारे ७५0 ते ९५० ब्रास अवैध वाळू उपसली जाते. म्हणजेच हे प्रमाण सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार ४०० टन होते. यातून रोज सुमारे ४५ ते ५० लाख रूपयांची लूट होत असल्याची डोळे विस्फारणारी माहिती उजेडात येत आहे. तरीही महसूल, आरटीओ, पोलिस यंत्रणा मूग गिळून गप्प कशी?, असा त्रस्त ग्रामस्थांचा प्रश्‍न आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT