नाशिक

जळगावात ३ कोटी ७२ लाखांची महाफसवणूक!

CD
जळगावात तीन कोटी ७२ लाखांची फसवणूक ----- बिल्डर साहित्यासह सात संशयितांवर गुन्हा दाखल; बनावट परवानग्या दाखवून कार्यालयाची विक्री सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : शहरातील खानदेश सेंट्रल मॉल परिसरातील संत बाबा हरदासराम व्यापारी संकुलामधील तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाची कुठलीही परवानगी नसताना बेकायदा बांधकाम करून परवानगीचे बनावट कागदपत्रे दाखवून कार्यालयाची जागा तब्बल तीन कोटी ७२ लाख रुपयांत विकली. तीच जागा दुसऱ्यालाही विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सुरेश तलरेजा यांच्या तक्रारीवरून विकासक खुबचंद साहित्या (खुबाशेठ) याच्यासह के. पी. इन्फ्रास्ट्रक्चर व जयराम इन्फ्रास्ट्रक्चरच्या अशा एकूण सात संचालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील रिअल इस्टेट ब्रोकर सुरेश नंदलाल तलरेजा (वय ६०, रा. गणपतीनगर) यांना संशयितांनी कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस विकण्याचे ठरविले. सुरुवातीला तिसऱ्या मजल्याच्या बांधकामाची महापालिकेची परवानगी नसल्याने तक्रारदारांनी नकार दिला. मात्र, संशयितांनी महापालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांची सही व शिक्का असलेले बनावट लेटरहेड दाखवून परवानी मिळविल्याची खात्री करून दिली. परिणामी, याच विश्‍वासावर तलरेजा यांनी वेळोवेळी तीन कोटी ७२ लाख रुपये रोकड व बँक व्यवहाराद्वारे (आरटीजीएस) दिले व जागेचा ताबा घेतला. त्यानंतर अंतर्गत सजावट, फर्निचरवर अतिरिक्त ३५ लाख रुपये खर्च करून तिथे स्वतःचे कार्यालय सुरू केले. असा उघडकीस आला प्रकार जुलै २०२६मध्ये महापालिकेत चौकशी केली असता, कॉम्प्लेक्सला केवळ पहिल्या मजल्यापर्यंतच बांधकामाची परवानगी असल्याचे उघड झाले. इतकेच नव्हे तर, तक्रारदार ताब्यात असलेल्या जागेचा वापर करीत असतानाच संशयितांनी संगनमत करून ही जागा इतर व्यक्तींच्या नावावर ‘ओपन टेरेस’ दर्शवून परस्पर खरेदीखत करून दिल्याचे निष्पन्न झाले. अखेर गुन्हा दाखल आपसांत संगनमत करून बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे, फसवणूक करणे व परस्पर खरेदीखत करून आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी के. पी. इन्फ्रारस्टक्चर व त्याचे प्रोप्रायटर म्हणून काम पाहणारे ममता अनिल साहित्या, अनिल खुबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खुबचंद साहित्या, जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस प्रा. लि. व विशाल रामगोपाल शर्मा (रा. मुंबई) अशा सात संशयितांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक सावित्री ढगे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT