नाशिक

बायपास वर पुन्हा अपघात

CD
NSK26H29000 व NSK26H28999 जळगाव : जखमी चालकाला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत असताना व दुसऱ्या छायाचित्रात अपघातग्रस्त वाहने. --- ‘बायपास’वर कंटेनर-ट्रेलरची समोरासमोर धडक --- दोन्ही चालक गंभीर; भीषण अपघातात वाहनांच्या केबिनचा अक्षरक्ष: चुराडा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : येथील पाळधी-तरसोद बायपासवर एकेरी मार्गानेच वाहतूक सुरू असताना, दुसऱ्या मार्गानेही वाहने येणे सुरूच आहे. त्यातच चुकीच्या दिशेने आलेले ट्रेलर व कंटेनर एकमेकांवर धडकले. यात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. अपघातामुळे तब्बल चार तास या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. हा अपघात रविवारी (ता. ६) दुपारी अडीचच्या सुमारास तरसोद फाट्यापासून काही अंतरावर झाला. नित्कृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे पाळधी-तरसोद बायपास मार्गावरील पुल उद्‌घाटनानंतर काही महिन्यांतच ढासळला. त्याच्या दुरुस्तीसाठी धुळ्याकडून नागपूरकडे जाणारी एकच बाजू वाहतुकीसाठी सुरू आहे. असे असताना, चंद्रपूर येथून लोखंडी अँगल घेऊन जाणारा ट्रेलर (एनएल ०१, एके ११०४) जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून न जाता बायपासने गेला. एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जाताना समोरून आलेले कंटेनर (एचआर ४७, एफ २५८१) व ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रेरलच्या पुढील भागाचा चुराडा होऊन कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात ट्रेलरचालक अंग्रेजसिंग अरुंधवा (वय ५६, रा. रायपूर, छत्तीसगढ) याच्यासह ट्रेलरचालक गंभीर जखमी झाला. यातील अरुंधवा यांचे दोन्ही पाय वाहनात अडकून चेंदामेंदा झाले होते. त्याला जळगाव जिल्‍हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने खासगी रुग्णालयात हलविले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन्ही वाहनांच्या धडकेत ट्रेलरची कॅबिन दबली गेल्याने चालकही त्यात अडकला होता. रस्त्याने जाणाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, चालकाला बाहेर काढता येत नसल्याने ६० ते ७० जणांनी मिळून कॅबिनचा दरवाजा तोडला व चालकाला बाहेर काढले. वाहतुकीचा खोळंबा बायपासवर अपघात झाल्यानंतर जळगाव तालुका व नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, घटनास्थळाच्या हद्दीबाबत एकमेकांकडे बोट दाखविण्यात आले. या टोलवाटोलवीमध्ये रात्रीपर्यंत अपघातासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नव्हता. तरीही वाहने विरुद्ध दिशेने गेल्या ३१ ऑगस्टलाही एकेरी मार्गाने जाणाऱ्या वाहनाला ट्रकने धडक दिल्याने एक ठार व चार जण जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना नसणे व विविध कारणांवरून ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तरीही नशिराबादकडून येणारी वाहने विरुद्ध दिशेने जात असल्याचे रविवारी पुन्हा एकदा समोर आले व दोन अवजड वाहनांचा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT