नाशिक

हरसूल येथे आंदोलन फायनल

CD
पान-३ छायाचित्र : ००८१८, ००८१९ हरसूल : आश्रमशाळांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करताना जीवन भोये, विवेक गवळी आदी. दुसऱ्या छायाचित्रात आंदोलनस्थळी उपस्थित आमदार हिरामण खोसकर, विनायक माळेकर आदी. (छायाचित्र : राहुल बोरसे) --- ३६-४ आश्रमशाळांच्या प्रश्नासाठी हरसूल येथे आंदोलन --- सकाळ वृत्तसेवा हरसूल, ता. ६ ः अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, तसेच अनिवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासन आणि संस्थाचालकांचे लक्ष वेधण्यासाठी येथील केबीएच विद्यालयाजवळ जीवन भोये व विवेक गवळी यांच्या नेतृत्वाखाली येथे ‘भीक मांगो’ आंदोलन सुरू आहे. आंदोलक निषेध म्हणून नागरिकांकडून केवळ चिल्लर स्वीकारत आहेत. जमा झालेली रक्कम संबंधित संस्थेला देण्यात येणार आहे. आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काही मागण्या मांडल्या आहेत. त्या अशा ः शाळा परिसराला संरक्षक भिंत, रात्री पथदीप, विद्यार्थ्यांना स्वतंत्र बेड, गाद्या, स्वच्छ स्वच्छतागृहे, पिण्यासाठी शुद्ध पाणी, सोलर वॉटर हीटर, कपडे धुण्याची स्वतंत्र व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित सुविधा, तक्रार पेटी, सफाई कर्मचारी व निवासी नर्सची नियुक्ती, आधुनिक संगणक शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा आणि वाचनालयाच्या सुविधा उपलब्ध कराव्यात. आंदोलनप्रसंगी आमदार हिरामण खोसकर, विनायक माळेकर, डॉ. रघुनाथ भोये, मिथुन राऊत, योगेश आहेर, लक्ष्मण मेघे, राहुल चौधरी उपस्थित होते. ग्रामस्थांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन चिल्लर स्वरूपात भीक द्यावी, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेत सकारात्मक निर्णय घ्यावा, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जीवन भोये व विवेक गवळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT