नाशिक

शालर्थ आयडी घोटाळा

CD
शालार्थ आयडी घोटाळा (लोगो) --- संजय गरुडची अखेर कारागृहात रवानगी --- दीपक गरुडच्या जामिनावरही सुनावणी, साळुंकेला आज न्यायालयात आणणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेला सहायक प्रयोगशाळा कर्मचारी तुषारकुमार साळुंके याच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यास सोमवारी (ता. ७) नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. दीपक गरुड याच्या जामीन अर्जावरही सुनावणी आहे. दरम्यान, गेल्या २८ जुलैपासून नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली दाखल असलेला शेंदुर्णी (ता. जामनेर) शिक्षण संस्थेचा अध्यक्ष संजय गरुडची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. लवकरच त्याला चौकशीसाठी शहर गुन्हे शाखा ताब्यात घेण्याची शक्यता आहे. --- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी गेल्या आठवड्यात शिरपूरमधून संशयित तुषारकुमार साळुंके यास अटक करण्यात आली होती. साक्रीतील शाळेत लॅब असिस्टंट असलेला संशयित साळुंके याने संशयित एजंट प्रशांत वाडिले याच्याशी संगनमत करून बनावट शालार्थ आयडी तयार केले होते. त्यासाठी त्याने जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, वेतन पथक अधीक्षक मीनाक्षी गिरी यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तांत्रिक शिक्षणात तज्ज्ञ असलेल्या साळुंकेचा या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांनी वापर करून घेतला. दरम्यान, त्याचा लॅपटॉप फॉरमॅट झालेला असल्याने त्यातील माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी तो फॉरेन्सिक लॅबकडे दिला आहे. साळुंकेच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यास सोमवारी (ता. ७) नाशिक रोड न्यायालयात हजर केले जाणार आहे. संजय गरुड कारागृहात शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व भाजपचा पदाधिकारी संजय गरुड याला २७ जुलैला सोलापूरच्या फार्महाउसमधून अटक केली. परंतु दुसऱ्याच दिवशी तो वैद्यकीय कारणास्तव नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे त्याची चौकशी पोलिसांना करता आली नव्हती. दरम्यान, गेल्या आठवड्यात त्याने त्याचा जामीन अर्ज मागे घेतला. त्यास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यामुळे शहर गुन्हे शाखेकडून त्यास चौकशीकामी पुन्हा ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. --- दीपकच्या जामिनावर सुनावणी शेंदुर्णी शिक्षण संस्थेचा सहसचिव दीपक गरुड सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला असून, त्यावर उद्या (ता. ७) सुनावणी आहे. वैद्यकीय कारणास्तव सध्या तो कारागृहातीलच दवाखान्यात दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT