नाशिक

आदिवासी विद्यार्थी आंदोलन

CD
पान-८ मेन -------- NSK26H29002 नाशिक ः आदिवासी विद्यार्थ्यांच्या मुंबईतील पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी रात्री येथे झालेल्या बैठकीत चर्चा करताना विद्यार्थी व विविध संघटनांचे प्रतिनिधी. -------- गणेशोत्सवात आदिवासींचा मोर्चा मुंबईत सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीच्या बैठकीत निर्णय सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : आदिवासी वसतिगृहातील असुविधांच्या विरोधात येथे १७ ऑगस्टपासून सुरू असलेले उपोषण आंदोलन ऐन गणेशोत्सवाच्या काळातच मुंबईत धडकणार आहे. येत्या १५ ते २० सप्टेंबरदरम्यान हे आंदोलन मुंबईत घेऊन जाण्याचा निर्धार सकल आदिवासी समाजातर्फे रविवारी (ता.६) रात्री उशिरा येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. ------------- सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीची रविवारी रात्री ९ ते अकरादरम्यान महत्त्वपूर्ण बैठक नाशिकमध्ये पार पडली. बैठकीस विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाची पुढील दिशा, मुंबईकडे करण्यात येणाऱ्या आंदोलनाची तारीख व नियोजन तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रतिनिधी व विविध विद्यार्थी संघटनांसोबत समन्वय साधण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यभरातून आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी होणार असल्याने प्रमुख जिल्ह्यांमध्ये समन्वयक स्वतः जाऊन त्या ठिकाणी आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करणार आहेत, त्याचे नियोजन सोमवारी अंतिम करण्यात येईल, त्यानुसार मोर्चाची प्रमुख जबाबदारीही पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. .... २०-२ रविवारी रात्रीच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे - आदिवासी विकास विभागाचे मंत्री, सचिव, आयुक्त हटवा - गडचिरोली जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा - सेंट्रल किचन व्यवस्था बंद करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार भोजन व्यवस्था उपलब्ध करून द्या - आदिवासी आयोग महाराष्ट्रची स्थापना करा - देणगी पद्धत बंद करून मोफत शिक्षण - आदिवासी शिक्षणातील खासगीकरणाला विरोध - बिंदू नामावली संदर्भातील प्रश्न तातडीने सोडवा - आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सुरक्षिततेची हमी द्या -------------

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT