नाशिक

पावसासाठी सातपुड्यातील शेतकऱ्यांचे महादेवाला साकडे

CD
फोटो : NSK26H29013/NSK26H29012 नंदुरबार : हंड्याने पाणी वाहताना शेतकरी. दुसऱ्या छायाचित्रात पाण्याने भरलेला महादेवाचा गाभारा. -------------------------- सातपुड्यातील शेतकऱ्यांचे पावसासाठी महादेवाला साकडे दहा हजार लिटर पाण्याने भरला मंदिराचा गाभारा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ७ : जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अनेक भागात पावसाअभावी उभी पिके सुकू लागली असून, गुरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी सातपुड्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी धडगाव येथील पुरातन महादेव मंदिरात महादेवाला साकडे घातले. या वेळी शेतकऱ्यांनी मंदिराचा गाभारा १० हजार लिटर पाण्याने भरला. पाऊस पडेपर्यंत गाभाऱ्यातील महादेवाची पिंड पाण्यात राहणार आहे. महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यामुळे पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. पावसाने पाठ फिरवल्यास महादेवाचा गाभारा पाण्याने भरून पिंड पाण्यात ठेवण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. सातपुडा परिसरातील शेतकऱ्यांची अनेक वर्षांची ही पारंपरिक श्रद्धा आहे. त्यानुसार गावातील शेतकरी बांधव आणि ग्रामस्थांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन मंदिरात पाणी आणले. देवाचा विधिवत अभिषेक आणि पूजा-अर्चा केल्यानंतर संपूर्ण मंदिराचा गाभारा पाण्याने काठोकाठ भरण्यात आला. जोपर्यंत वरुणराजा प्रसन्न होऊन समाधानकारक पाऊस पाडत नाही, तोपर्यंत महादेवाची पिंड पाण्यात राहू देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला. प्रदीर्घ खंडामुळे सातपुड्यात खरिपाची पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. विहिरी, बोअरवेल आणि स्थानिक जलस्रोतांची पातळी खालावल्याने आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे सावट ओढवण्याची भीती आहे. चारा टंचाईमुळे मुक्या जनावरांना जगवायचे कसे, असा पेच शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सर्व पातळ्यांवर हतबल झालेल्या बळीराजाने आता ईश्वराच्या चरणी प्रार्थना करत वरूणराजा प्रसन्न व्हावा आणि मुसळधार पाऊस पडावा यासाठी आर्जव केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT