फोटो : NSK26H29014
नंदुरबार : विद्युतीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना डॉ. अभिजित मोरे. शेजारी रतन पाडवी, योगेश चौधरी, मधुकर पाटील आदी.
---------------------
स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेलगदा- गोराडी गावात पोहचणार वीज!
डॅा. अभिजित मोरे यांच्या हस्ते विद्युतीकरण कामाचे भुमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार : सातपुड्यातील अनेक वाड्या-पाड्यांर्पंत अद्यापही वीज पोहचलेली नाही. यापैकीच असलेल्या शेलगदा, गोराडी गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज पोहचणार आहे. यासाठी विद्युतीकरण कामाला मंजुरी मिळाली असून, यासाठी लागणारा निधीदेखील मंजूर झाला आहे. धडगाव तालुक्यातील कारभारीपाडा ते शेलगदा- गोराडी विद्युतीकरण कामाचे भुमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
रतन पाडवी व गोराडीचे माजी सरपंच केवजी पाडवी यांनी डॉ. अभिजित मोरे यांच्याकडे विद्युतीकरण कामाची मागणी केली होती. तत्कालीन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या कामासाठी जिल्हा नियोजन विभागातर्फे मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करुन दिला. आता या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यामुळे या गावातील वीजसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमास तळोदा तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, गोराडीचे सरपंच केवजी पाडवी, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, शहादा तालुकाध्यक्ष संतोष पराडके, युवक जिल्हा उपाध्यक्ष तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष छोटू कुवर, धडगाव तालुकाध्यक्ष रवी पावरा, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष संजय खंडारे, तळोदा नगरसेवक इमरान खाटीक, पं. स. सदस्य ठाणसिग पावरा, खडक्या गावाचे सरपंच नवलसिग वळवी, सुरवाणीचे सरपंच रोहिदास पाडवी, अठ्ठी गावाचे सरपंच शिल्या वसावे, धुवाणी गावाचे सरपंच रतन पाडवी, ग्रा. पं. सदस्य ॲड. सचिन वसावे, ॲड. कोटा वळवी, दारासिंग भील, धडगाव महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा रजंना पाडवी, छगन पावरा आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.