संत कबीरांचा सांगीतिक शोध
घेणारा कार्यक्रम आता मुंबईत
उपशीर्षक
‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : संत कबीरांच्या काव्याचा, साहित्याचा आणि दोह्यांमधून व्यक्त होणाऱ्या विचारविश्वाचा संगीतमय शोध घेणारा ‘हंस अकेला’ हा परिवर्तन निर्मित विशेष सांगीतिक कार्यक्रम येत्या ११ सप्टेंबरला मुंबईत सादर होणार आहे.
मुंबईतील प्रतिष्ठित यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात हा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला असून, याच कार्यक्रमात कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि परिवर्तन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहतील.
१४-१
‘हंस अकेला’बद्दल..
‘हंस अकेला’ ही परिवर्तन, जळगावची एक महत्त्वपूर्ण सांगीतिक निर्मिती असून, संत कबीरांच्या विचारांचा आणि त्यांच्या समृद्ध साहित्यविश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. संत कबीरांचे काव्य, दोहे आणि त्यामधून व्यक्त होणारे मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान संगीताच्या प्रभावी माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.