नाशिक

नंदुरबारात २२ सप्टेंबरला ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव

CD
फोटो : NSK26H29024 (लोगो) --------------------- नंदुरबार येथे २२ सप्टेंबरला ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव नंदुरबार, ता. ७ : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत लोककलेचा वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे नंदुरबार येथे २२ सप्टेंबरला एस. ए. मिशन हायस्कूल जिमखाना येथे ‘जल्लोष लोककलेचा’अंतर्गत एकल व समूह लोककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बालरंगभूमी परिषदेच्या नंदरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य नागसेन पेंढारकर यांनी याबाबत माहिती दिली. बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा ॲड. नीलम शिर्के- सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध लोककला प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पाचही लोककला प्रकारांत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कलाकारांना राज्यस्तरीय लोककला स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ‘जल्लोष लोककलेचा’ अंतर्गत एकल नृत्य, एकल गायन, एकल वाद्य, समूह नृत्य आणि समूह गीतगायन या पाच लोककला प्रकारांच्या स्पर्धा यात होणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत प्रमुख सैय्यद इसरार अली, उपप्रमुख तुषार सोनवणे, सदस्य म्हणून तुषार ठाकरे, भीमसिंग वळवी आणि काशिनाथ सूर्यवंशी यांचा समावेश आहे. विद्यार्थी व बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, कार्याध्यक्ष मनोज सोनार, प्रमुख कार्यवाहक राजेश जाधव, उपाध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT