नाशिक

भवानी मंदिरात केदारनाथाचा देखावा

CD
टुडे ३ ॲंकर NSK26H29065 जळगाव : श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील खोटेनगर परिसरातील कुबरेश्वर मंदिरात अमरनाथ येथील बाबा बर्फानीची साकारण्यात आलेली पिंड. -- भवानी मंदिरात केदारनाथाचा देखावा श्रावण सोमवार महोत्सवाचा समारोप; भजनसंध्येला भाविकांचा उत्साह सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : सुभाष चौक, सराफ बाजार परिसरातील श्री भवानी तथा महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या श्रावण सोमवार महोत्सवाचा सोमवारी (ता. ७) उत्साहात समारोप झाला. यानिमित्त मंदिर सभागृहात हिमालयातील प्रसिद्ध केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. आकर्षक आरास आणि फुलांच्या सजावटीमुळे मंदिर परिसराला भक्तिमय झाला होता. श्रावण सोमवारनिमित्त दुपारी तीनला ११ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. आचार्य म्हणून राजा जोशी यांनी पौरोहित्य केले. गंगाजल, नर्मदा जल, दूध, गुलाबजल, उसाचा रस, नारळपाणी, तूप, पंचगव्य आणि सुगंधी जलाने शिवलिंगाचा अभिषेक करण्यात आला. सायंकाळी विशेष शृंगार व पूजनानंतर महाआरती करण्यात आली. भाविकांसाठी साकारलेली आठ बाय आठ फूट आकाराची व दहा फूट उंच केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. महाआरतीनंतर ‘हर घर सुंदरकांड भजन मंडळा’तर्फे भजनसंध्या झाली. प्रमुख गायिका दीपा तापडिया यांच्यासह किरण शर्मा, मेघराज सोनी व प्रदीप जोशी यांनी शिवभजने सादर केली. भजनांवर भाविकांनी ठेका धरत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान कलावंत व मंदिर सेवकांचा सत्कार करण्यात आला. रात्री शयनआरतीनंतर गोपाल तिवारी व उत्तम जोशी परिवारातर्फे दुग्धप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Rules: ग्राहकांना मोठा दिलासा! सिलिंडर वितरण नियमात बदल, बुकिंगमधील अंतर केले कमी

Tigress Captured : युवतीसह शेतकऱ्याला ठार मारणारी वाघीण जेरबंद

Kirit Somaiya : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी कथित बेकायदेशीर अतिक्रमण; लँड जिहाद चा धक्कादायक प्रकार, आंदोलनाचा दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT