नाशिक

डॉ. सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

CD
NSK26H29028 जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात संस्कृत सप्ताहाचे उद्‌घाटन करताना डॉ. उल्हास पाटील व मान्यवर. ------- डॉ. सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.७ : येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेचा वारसा जपणे आणि आयुर्वेदातील मूळ संस्कृत ग्रंथांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे, प्रसार व प्रचाराच्या उद्देशाने आयोजित ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात पार पडला. सप्ताहभराच्या या आयोजनात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये संस्कृत संभाषण कार्यशाळा, श्लोक पठण स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा यांसारख्या विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. सुषमा खानापूरकर, राजश्री देशमुख, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, प्राचार्य डॉ. शिवानंद आठवले आदी उपस्थित होते. प्रा. अमिता निकम यांनी प्रास्ताविक केले. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

'समोर निवेदिता सराफ अन् अशोकमामांसोबत रोमँटिक सीन'; मेघा घाडगेने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली...

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल पुढचा काळ? शनीच्या साडेसातीपासून कधी मिळणार दिलासा?

Onion Price Hike: कांद्याने ओलांडली 'पन्नाशी'! घाऊक भाव ५३, किरकोळ ७० रुपयांवर

SCROLL FOR NEXT