नाशिक

दि. ना. उघाडे- प्रेस

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H29018 धुळे : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलतांना आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे. शेजारी इतर पदाधिकारी. --- नामांतरासाठी संसद भवन पीएम मोदींना घेराव घालणार --- दि. ना. उघाडे : उपवर्गीकरणाचा खेळही बंद करावा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मीनस नाव देण्यात यावे. याप्रमुख मागणीसह आदिवासी समुदायाच्या इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी सेना ३० सप्टेंबरला संसद भवन, राष्ट्रपती भवनासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेराव घालणार, अशी माहिती आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. उघाडे म्हणाले की, रेल्वे स्थानकाच्या नामांतरणासाठी निवेदने दिली, आंदोलने केली, राज्यातील महायुती सरकारला यासासाठी विशेष आधिवेशन बोलवा अशी मागणी केली. मात्र, ते कुंभमेळाव्यात अडकले आहे. राज्यातील युती सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करीत आहे. आता नामांतर हे केंद्रातूनच शक्य असल्याने ३० सप्टेंबरला दिल्लीत संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेराव घालणार, त्यासाठी राज्यासह देशभरातून पाच ते दहा हजार कार्यकर्ते दिल्लीत जाणार असल्याचे उघाडे म्हणाले. उपवर्गीकरणामुळे अशांतता महाराष्ट्रात उपवर्गीकरणाच्या माध्यमातून लहान-लहान जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम सरकारने बंद केले पाहिजे. उपवर्गीकरणामुळे राज्य आणि देश अशांत होईल, मने कलुशित होतील. त्यामुळे देशातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी उपवर्गिकरणाचा खेळ बंद करावा, अशी मागणीही उघाडे यांनी केली. उपवर्गिकरणाला सत्तेत बसलेले एसटी- एसटी वर्गातील नेते समर्थन करीत आहेत. विरोध केला तर खुर्ची जाईल, अशी भिती त्यांना वाटत असल्याचे उबाळे म्हणाले. आदिवासी सेनेने १९९२ पासून वन खात्याची अतिक्रमित जमीन आदिवासींच्या नावावर करण्याची मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT