नाशिक

रामवारीने नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्ग दुमदुमला

CD
NSK26H29073 टाळ-मृदंगाच्या गजरात रामवारी त्र्यंबकेश्वरी पावसाच्या सरींतून भक्तांची पायी वाटचाल; हरिहर भेटीची पारंपरिक परंपरा जपली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : टाळ-मृदंगाचा नाद, हरिनामाचा गजर आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या अखंड घोषात पंचवटीतील काळाराम मंदिरातून निघालेली पारंपरिक रामवारी पायी दिंडी श्रावणातील चौथ्या सोमवारी भक्तिभावाने त्र्यंबकेश्वर येथे पोहोचली. पावसाच्या सरी आणि रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करत शेकडो वारकऱ्यांनी श्रद्धेची ही वाट पूर्ण केली. पंचवटीतील श्रीराम भक्त वारकरी ट्रस्ट आणि नाशिक वारकरी सांप्रदायिक यांच्या वतीने दरवर्षी रामवारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हरिहर भेटीच्या पारंपरिक संकल्पनेनुसार श्रीरामाची तुळस त्र्यंबकेश्वराला अर्पण केली जाते, तर त्र्यंबकेश्वराची बिल्वपत्रे श्रीरामाला वाहिली जातात. या अनोख्या धार्मिक परंपरेमुळे रामवारीला विशेष महत्त्व आहे. त्र्यंबकेश्वर मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वारकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही पावसाच्या सरींत ‘विठ्ठल रखुमाई’चा जयघोष करीत दिंडीने आपली वाटचाल सुरू ठेवली. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. महिला आणि पुरुष वारकरी अभंग-भजन गात, टाळ-मृदंगाच्या तालावर शिस्तबद्धपणे पुढे सरकत होते. त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पोहोचली. तेथे भजन-कीर्तनाने वातावरण अधिक भक्तिमय झाले. त्र्यंबकेश्वराची बिल्वपत्रे श्रीरामाला अर्पण करून हरिहर भेटीच्या या पारंपरिक रामवारीचा भक्तिभावाने समारोप करण्यात आला. दरम्यान, नाशिकमधून त्र्यंबकेश्वरकडे तीन ते चार रामवारी दिंड्या रवाना झाल्या असून, काळाराम मंदिरातून निघालेल्या दिंडीने या वारीचा प्रारंभ केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT