नाशिक

न्याय विश्वास फाउंडेशनच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

CD
NSK26H29042 जळगाव : शिवाजीनगर भागात रविवारी झालेल्या न्याय विश्‍वास फाउंडेशनच्या शिबिरात नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना ॲड. अनिकेत निकम. -------- न्याय विश्वास फाउंडेशनच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद उपशीर्षक पाचशेहून अधिक नागरिकांना मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : न्याय विश्वास फाउंडेशनतर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेले चौथे मोफत सल्ला व मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. नवीन कानळदा रोडवरील राजाराम हॉल जळगाव येथे झालेल्या या उपक्रमात ५०० पेक्षा अधिक नागरिकांना विविध प्रश्नांवर तज्ज्ञ वकिलांकडून मोफत मार्गदर्शन करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबिर पार पडले. यामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक तंटे, पती-पत्नीमधील वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, जमीन-मालमत्तेशी संबंधित प्रश्न, ७/१२ उताऱ्यातील अडचणी आणि शेतीतील तंट्यांवर कायदेशीर दिशा दाखवण्यात आली. याशिवाय ऑनलाईन आर्थिक फसवणूक, वाढते सायबर गुन्हे, प्रॉव्हिडंट फंड , सर्व्हिस मॅटर, पोलीस तक्रारी, एफआयआर, विविध विमा संबंधित खटले ,कोर्टातील प्रलंबित केसेस आणि चेक बाउंसच्या प्रकरणांवर उपस्थितांना मोफत सल्ला देण्यात आला. तसेच महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार आणि शासकीय स्तरावरील मोफत कायदेशीर मदतीबाबतही सविस्तर माहिती पुरविण्यात आली. ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

SCROLL FOR NEXT