नाशिक

सटाणा ग्लेझ लेख दौलतराव गांगुर्डे

CD
मालेगाव पान-२--ॲंकर ( फोटो २८ ला प्रसिद्ध जाहिरातीत आहे. )------- फोटो ः दौलतराव गांगुर्डे ------- ३६-४ एका नकाराने दिला आयुष्याला आकार अन समद्धीही! ------------- १६-१ एखादा नकार मनाला वेदना देतो; मात्र त्याच वेदनेचे रूपांतर संकल्पात झाले, तर तो नकार अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. बागलाणच्या मातीतून उभे राहिलेले शिक्षणप्रेमी डॉ. दौलतराव राघो गांगुर्डे यांच्या जीवनप्रवासाची कहाणी अशाच जिद्दीची आहे. - अंबादास देवरे, सटाणा -------------- वटार येथील कष्टकरी शेतकरी कुटुंबात १९६६ मध्ये डॉ. गांगुर्डे यांचा जन्म झाला. अपुरी शेती, वडिल शेतमजूर, सहा भाऊ आणि दोन बहिणी अशा मोठ्या कुटुंबातील धाकटे दौलतराव यांनी मात्र परिस्थितीपुढे हार मानली नाही. दहावीनंतर त्यांनी के.टी.एच.एम. महाविद्यालयात अकरावी-बारावी आणि पंचवटी महाविद्यालयातून बी.एस्सी.ची पदवी घेतली. हाफकिनमध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण व नोकरीचा अनुभव मिळविला. काही कारणांमुळे नोकरी सोडल्यानंतर नाशिकमध्ये खासगी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत काम केले. मात्र नोकरीपेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द त्यांच्या मनात होती. १९८९ मध्ये महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेत आईच्या नावाने सटाणा येथे ‘मोना क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब’ सुरू केली. १९९५ मध्ये बागलाण तालुक्यातील पहिली संगणकीकृत पॅथॉलॉजी लॅब उभारली. पत्नी अंजली यांचे शिक्षण बी. ए., बी.एड.पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. श्री. गांगुर्डे ज्या संस्थेच्या व्यवस्थापन समितीवर होते, त्या संस्थेने त्यांच्या पत्नीला नोकरीची संधी नाकारली. यातून डॉ. गांगुर्डे यांच्या मनाने सकारात्मक विचार करत ‘आपल्याला संधी मिळाली नाही, तर इतर मुला-मुलींना संधी मिळण्यासाठी आपणच व्यासपीठ उभे करायचे,’ असा निर्धार त्यांनी केला आणि १९९९ मध्ये ‘मोना एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी’ची स्थापना झाली. १६-१ छोट्या सुरुवातीचा विस्तार सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम, विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. २००४ मध्ये मित्रनगर परिसरात ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू झाले. ५० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या शाळेपासून आज कनिष्ठ महाविद्यालय, सेमी इंग्रजी शाळा आणि अंजली इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल अशा विविध शैक्षणिक शाखांमधून संस्थेचा विस्तार झाला. हजारो विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहाशी जोडले गेले आहेत. शिक्षणासोबत रुग्णसेवेचा वारसा गांगुर्डे परिवाराने वैद्यकीय क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ज्येष्ठ पुत्र डॉ. भूषण आणि पत्नी डॉ. तृप्ती यांनी सटाणा येथे अंजली हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णसेवेला सुरुवात केली. धाकटे पुत्र डॉ. अक्षय गांगुर्डे हे एम.बी.बी.एस., एम.डी. असून त्यांच्या पत्नी डॉ. समृद्धी गांगुर्डे दंतचिकित्सक आहेत. कष्टकरी शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका मुलाने स्वतःच्या शिक्षणासाठी परिस्थितीशी केलेली झुंज पुढे असंख्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार बनली. डॉ. दौलतराव गांगुर्डे यांची कहाणी केवळ एका शिक्षणसंस्थेच्या विस्ताराची नाही; ती एका नकाराचे संधीत, संघर्षाचे चळवळीत आणि एका स्वप्नाचे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये रूपांतर करणाऱ्या जिद्दीची कहाणी आहे. (जाहिरात पुरस्कृत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT