मनपातील पाच अधिकारी
कर्मचाऱ्यांच्या बदल्या
आयुक्त आदित्य जीवने यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात बदल करत आयुक्त आदित्य जिवने यांनी पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसेच नवीन पदस्थापनेचे आदेश काढले आहेत. या फेरबदलामुळे विविध विभागांच्या कामकाजाची जबाबदारी नव्याने निश्चित करण्यात आली आहे.
रचना सहायक जयंत शिरसाठ यांची नगररचना विभागातील सहायक नगररचनाकारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी त्यांचे अंतिम मान्यता अधिकारी आयुक्त असतील. वरिष्ठ लिपिक लक्ष्मण सपकाळे यांच्याकडील आस्थापना अधीक्षकपदाचा कार्यभार काढून त्यांची प्रभाग समिती क्रमांक एकच्या प्रभाग अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. वरिष्ठ लिपिक अनुभा भट यांच्याकडे प्रभाग अधिकारी तसेच प्रभारी आस्थापना अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता योगेश वाणी यांच्याकडे परिवहन विभाग प्रमुखांसह घनकचरा व्यवस्थापन, अमृत १.० व २.० मलनिस्सारण आणि अमृत २ पाणीपुरवठा प्रकल्पांच्या प्रकल्प अभियंत्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता विशाल सूर्वे यांच्याकडे पाच प्रभागांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मूळ जबाबदारीसह रमाई आवास योजना व अन्य योजनांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.