नाशिक

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

CD
आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्‍चित करावी. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने आवश्यक समन्वय साधून कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासह विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजातर्फे सोमवारी (ता.७) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. धनगर समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यात यावा. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला हुतात्मा वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव द्यावे. चर्चगेट स्थानकाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण करावे. संत बाळूमामा देवस्थानच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची एसआयटी चौकशी पूर्ण करावी. तसेच देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांचे विशेष फॉरेन्सिक ऑडिट करावे. संत बाळूमामा आणि अहिल्यामाता देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा करावा आदी मागण्या करण्यात आल्या. श्री करवीर निवासिनी अंबामाता महालक्ष्मी देवस्थान, पंढरपूर व शिर्डी देवस्थानांसाठी स्वतंत्र, सक्षम आणि पारदर्शक देवस्थान कायद्याची निर्मिती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजातर्फे देेण्यात आला. आंदोलनात धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT