नाशिक

तो, गुटखा माफिया अद्याप मोकाटच

CD
लोगो : कारने चिरडण्याचा प्रयत्न तो ‘गुटखा’माफिया अद्याप मोकाटच बऱ्हाणपूर-जळगाव राजरोस वावर; पोलिसांना मात्र सापडेना सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहरातील शिरसोली रोडकडून येणाऱ्या दुचाकीला सुसाट कारने धडक दिल्याची घटना २ जुलैला घडली होती. या अपघातात रविकुमार वासदेव राजपाल गंभीर जखमी झाले. ‘गुटखा’माफियांकडून रविकुमार यांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले होते. याबाबत एमआयडीसी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून, या गुन्ह्यातील मुख्य संशयित अद्यापही पोलिसांना सापडून आलेला नाही. गुटखाविक्रेता व त्यांना पुरवठा करणाऱ्या गुटखामाफियांची टीप अन्न व औषध विभागाला दिल्याच्या संशयावरून सिंधी कॉलनीतील रविकुमार वासुदेव राजपाल (वय ४५) यांना सुसाट कारने चिरडून मारण्याचा प्रयत्न जुलैला सकाळी आठच्या सुमारास शिरसोली रस्त्यावर झाला. याप्रकरणी राजपाल यांच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल असून, गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच १९, ईजी ४९५२) पोलिसांनी जप्त केली असून, ही कार गुटखा व्यावसायिक दीपक चेतवाणी चालवत असल्याचे जखमी रविकुमार राजपाल यांनी पोलिसांना सांगितले होते. संशयित मिळेना प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर घटनेच्या दिवशी कारचालक दीपक चेतवाणी तेव्हापासूनच फरारी आहे. घटनेला दोन महिने उलटूनही तो पोलिसांना मिळून येत नाही. मात्र, त्याचा शहरातील सिंधी कॉलनीत रात्रीच्या सुमारास मुक्त संचार असून तो सद्या गुटख्याच्या मोठ्या डिल्ससाठी बऱ्हाणपूर येथे थांबून महाराष्ट्रात गुटख्याचा माल पाठवत आहे. चौकट साथीदाराला अटक गुन्ह्यात त्याच्यासोबत असलेला एका संशयित राजकिरण परदेशी याला एमआयडीसी पोलिसांनी १३ ॲागस्टला गावठी कट्ट्यासह अटक केली होती. त्यात त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. संशयिताचा ठावठिकाणा देखील सांगितला होता. मात्र, गुन्ह्यातील मुख्य संशयित दीपक चेतवानी पोलिसांना अद्याप मिळून आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

Loha News : पत्नी प्रेमापोटी मूकबधिर तरुणाचे मोबाईल टॉवरवर शोले स्टाईल आंदोलन

SCROLL FOR NEXT