नाशिक

म्हाडाच्या जमिनीवर डल्ला

CD
धुळे ः टुडे १ साठी -- धुळ्यात म्हाडाच्या जमिनीवर डल्ला - अनधिकृत मालमत्ता पत्रिकेप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) मालकीच्या जमिनीवर परस्पर नवीन मालमत्ता पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) तयार करून ती अनधिकृतपणे नावावर केल्याप्रकरणी म्हाडाने गंभीर पाऊल उचलले आहे. धुळे शहरातील सर्व्हे क्रमांक ४८४ मधील सि.स.क्र. ४७२७ मधील ७९५.०० चौमी क्षेत्राची बनावट व बेकायदेशीर पद्धतीने तयार करण्यात आलेली नवीन मालमत्ता पत्रिका रद्द करण्याबाबत म्हाडाच्या नाशिकस्थित मुख्याधिकाऱ्यांनी येथील भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना पत्र पाठवून नगरभूमापनच्या दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. -- मौजे धुळे येथील सर्व्हे क्र. ४८४ मधील सि.स.क्र. ४७२७ पैकी प्लॉट क्र. १ ब, क्षेत्र ७९५.०० चौमी हे म्हाडाच्या (नाशिक) मालकीचे व अधिकार अभिलेखानुसार मंजूर भू-अभिन्यासामध्ये समाविष्ट आहे. मात्र, धुळे नगरभूमापन अधिकारी कार्यालयाकडून नवीन मालमत्ता पत्रिका क्रमांक ४७२७/१/ब तयार करून त्यावर ९ मे २०२४ ला शबिहुल हसन महेबुल्ला खान यांच्या नावे नवीनधारक म्हणून नोंद (फेरफार क्रमांक ११६४४) घेण्यात आली. यात म्हाडाच्या मालकी हक्काची जमीन असताना आणि भू-अभिन्यासामध्ये कुठलाही बदल किंवा अधिकार नसताना ही मालमत्ता पत्रिका तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. -- प्रॉपर्टी कार्ड रद्द करा या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत नाशिकस्थित म्हाडाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी भूमी अभिलेख विभागाला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे, की संबंधित ७९५.०० चौमी क्षेत्राबाबत धुळे नगरभूमापन अधिकाऱ्यांनी केलेला आदेश आणि तयार केलेली मालमत्ता पत्रिका (क्र. ४७२७/१/ब, दि. ०९/०५/२०२४) तात्काळ रद्द करण्यात यावी. तसेच म्हाडाच्या मालकीची जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्याच्या नावे लावून देणाऱ्या संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. या प्रकरणी म्हाडाने नाशिक विभागीय महसूल आयुक्त आणि नाशिक विभागीय भूमी अभिलेखच्या उपसंचालकांनाही ही माहिती पत्राव्दारे दिली आहे. या गैरप्रकारामुळे महसूल व भूमी अभिलेख वर्तुळात खळबळ उडाली आहे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT