नाशिक

राष्ट्रवादीचे मिशन "एसआयआर, जेन झी’

CD
‘जेन झी’ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी एसआयआरमधून वगळलेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यावरही भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने नव्या पिढीतील मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या पिढीतील तरुणांना पक्षाच्या विचारधारेकडे आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा सूर सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत उमटला. तसेच एसआयआर प्रक्रियेतून वगळण्यात आलेली मतदारांची नावे पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे (दिंडोरी लोकसभा) आणि नाशिक लोकसभा जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन येथे आढावा बैठक झाली. बैठकीत ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या नव्या पिढीतील तरुण मतदारांशी अधिक प्रभावी संवाद साधून त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर एसआयआरच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्या अधिक सक्षम करण्यावरही पदाधिकाऱ्यांनी भर दिला. वगळण्यात आलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती मदत आणि प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांपासून पुढील विधानसभा व लोकसभा निवडणुकांपर्यंत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी नियोजन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT