नाशिक

सामाजिक दायित्व निधीतून बस

CD
फोटो आहे... शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सामाजिक दायित्व निधीतून बस विद्यार्थ्यांच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षणासाठी वाहतूक होणार सुलभ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ७ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व प्रशिक्षणविषयक उपक्रमांसाठी आयडीबीआय बँकेच्या सामाजिक दायित्व निधीतून ५० आसनी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसमुळे शैक्षणिक भेटी, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण आणि क्षेत्रीय अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची सुरक्षित व सुलभ वाहतूक होणार आहे. महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गीते यांच्या पुढाकारातून ही बस उपलब्ध झाली. त्यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. बँकेचे प्रादेशिक प्रमुख आशिष सिंह यांनी बसची चावी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संदीप गुंडरे यांच्याकडे सुपूर्द केली. वैद्यकीय अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध रुग्णालये, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह क्षेत्रीय प्रशिक्षणस्थळांना नियमित भेटी द्याव्या लागतात. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र बसची आवश्यकता होती. नव्याने उपलब्ध झालेल्या बसमुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची एकाच वेळी सुरक्षित व नियोजनबद्ध वाहतूक करणे शक्य होणार आहे. कुलगुरू डॉ. गीते यांनी या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशिक्षणविषयक व क्षेत्रीय उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. डॉ. गुंडरे यांनी प्रा. डॉ. गीते यांच्या पाठपुराव्यामुळे ही बस उपलब्ध झाल्याचे सांगून बँकेचे आभार मानले. यावेळी डॉ. दीपांजली लोमटे, डॉ. गणेश घुगे, डॉ. अनिता जाधव, डॉ. वैशाली अंतुर्लीकर, डॉ. स्मिता आव्हाड, डॉ. संजाता मुनेश्वर, विनायक मानकर, नरेंद्रसिंग पाटील, जगनाथ सोनवणे, बँकेचे भूषण गावकाड व श्रीपाद पुंडे यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT