महापालिकेच्या नव्या
विधिज्ञ पॅनेलसाठी अर्ज
---
जुन्या पॅनेलवर महासभेत झाले होते आरोप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : न्यायालयीन प्रकरणांमध्ये महापालिकेची बाजू प्रभावीपणे मांडली जात नसल्याने पालिकेला आर्थिक फटका बसत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नवीन विधिज्ज्ञ पॅनेल नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र व अनुभवी वकील, तसेच विधी फर्मकडून अर्ज मागविले असून, १८ सप्टेंबरच्या सायंकाळी सहापर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
महापालिकेविरोधात विविध न्यायालयांमध्ये निकाल लागल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा मागील महासभेत नगरसेवकांनी उपस्थित केला होता. महापालिकेच्या वकिलांकडून न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रभावीपणे बाजू मांडली जात नसल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी विद्यमान वकील पॅनेल बरखास्त करून नवीन पॅनेल नियुक्त करण्याची घोषणा केली होती. आता विधी विभागाने त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. ‘विधीज्ञ पॅनेल नियुक्ती, न्यायालयीन प्रकरण व्यवस्थापन, मानधन व कार्यपद्धती नियमावली, २०२६ च्या तरतुदीनुसार ही निवड प्रक्रिया होणार आहे. न्यायालयनिहाय पॅनेल, पात्रता, अटी-शर्ती आणि आवश्यक प्रतिज्ञापत्राचा नमुना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
चौकट
अर्जांसाठी १८ पर्यंत मुदत
अर्ज सादर करण्यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत असून, विहित मुदतीनंतर आलेले, तसेच अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. महापालिकेची न्यायालयीन बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी पात्र कायदे तज्ज्ञांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.